Today : 19:11:2019


चिमूर सहकारी तांदूळ गिरणीच्या प्रशासक पदावर अशासकिय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या प्रशासनाने, मुख्य प्रशासकपदी डॉ.श्यामजी हटवादेची नियुक्ती पदभार स्विकारला अशासकिय प्रशासकांनी

फिरोज पठाण, चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात प्रसिद्ध असलेली चिमूर सहकारी तांदूळ गिरणी समितीच्या अनियमित कारभारामुळे समिती चे संचालक बरखास्त करण्यात आल्यावर प्रशासक ची नियुक्ती करण्यात आली परंतु आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाने भात गिरणी समितीवर अशासकिय प्रशासकांची नियुक्त्या सहायक निबंधक, सहकारी संस्था चिमूर यांचे कार्यलयातून करण्यात आल्या असून सहायक निबंधक तथा तांदूळ   गिरणी समिती चे तत्कालीन सौ.एल.व्ही.काटोले प्रशासक यांच्या उपस्थितीत पदभार देण्यात आला.
     चिमूर सहकारी तांदूळ गिरणी समिती र.न.१९१६  चिमूर ह्या संस्थेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८ (अ) नुसार प्रशासक म्हणून सौ एल व्ही काटोले ची नियुक्ती करण्यात आली होती. कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुबई यांचे आदेशाने (८) व्यक्तीच्या अशासकिय प्रशासकिय  मंडळाची नियुक्तीसाठी मंजुरी मिळाली असल्याने सहायक निबंधक चिमूर यांनी नियुक्त्या केल्या असून त्यात डॉ.शामजी हटवादे, योगेश उर्फ श्रीकांत नाकाडे, विनोद चोखरे, समीर राचलवार, किसन पंधरे, बंडू हजारे, संजय कुंभारे, लक्ष्मण गजभिये यांचा अशासकिय प्रशासक म्हणून दि २७ नोव्हेबर २०१७ च्या आदेशाने  सहायक निबधंक सहकारी संस्था चिमूर यांनी नियुक्त्या जाहीर केल्या.
     यावेळी  चिमूर सहकारी तांदूळ गिरणी समिती नवं नियुक्त अशासकिय मुख्य प्रशासक डॉ. श्यामजी हटवादे म्हणाले कि, न का वाघे यांनी वर्तमान पत्रातून केलेले आरोप खोटे असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८ (अ)  नुसार अशासकिय प्रशासकांच्या नियुक्त्या हया अवैध नसून वैध असल्याचे सांगत ते म्हणाले कि, संस्थेला प्रगती पथावर नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल संचालक मंडळ व संस्थेच्या सभासदांना विश्वासात घेण्यात येईल या निवडीचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकार मंत्री सुभाष देशमुख पालकमंत्री सुधीर मुंगटीवार  आमदार किर्तीकुमार भांगडीया आमदार मितेशजी भांगडीया यांना दिले.
     यावेळी सहकारी तांदूळ गिरणी समितीचे माजी अध्यक्ष बंडुभाऊ नाकाडे, देवा मुंगले आदी उपस्थित होते संचालन एस भलमे यांनी केले.
News - Chandrapur | Posted : 2017-11-28


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसं