Today : 21:09:2019


चिमूर नगर परिषद मधील पायाभूत सुविधा व नागरी सुविधा कामातील अनियमीतता करणाऱ्या यंत्रणेची चौकशी करून कारवाई करा जिल्हाधिकारीना दिले कांग्रेस नगरसेवकांनी निवेदन

फिरोज पठाण, चिमूर :- चिमूर नगरपरिषद अंतर्गत पायाभूत व नागरी सुविधा अंतर्गत निधीचे कामे झाले असून त्या कामात अनियमितता असल्याने मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने त्या यंत्रणेची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी कांग्रेस नगरसेवक अँड अरुण दुधनकर यांनी जिल्हाधिकारीयांना निवेदनातून केली आहे.
     चिमूर नगर परिषदेची स्थापना दि ३० मे २०१५ ला झाली असून विकास कामासाठी नागरी सुविधा, पायाभूत सुविधा, वैशिष्टपूर्ण निधीमधून विविध कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली सदर निधी सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत वळती करण्यात आली प्रशासकीय मान्यता व्यतितिक्त आपल्या मर्जी नुसार कामे करणे सुरू आहे. जिल्हाधिकारी यांची प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक असताना नियमाला डावलून कामे सुरू आहे सदर कामे निकृष्ठ दर्जाची झाली असून ६ महिन्यातच क्रांक्रीट रस्त्याच्या भेगा पडल्या आहे, गिट्टी उखळली आहे रस्ता पूर्ण झाल्यावर बाजूला ३ फूट मुरूम टाकणे गरजेचे असतांना अजून पर्यत मुरूम टाकण्यात आले नाही त्यामुळे रस्त्याची उंची  वाढली असल्याने अपघात चे प्रमाण वाढले आहे.
     नागरी व पायाभूत सुविधा कामाची चौकशी करून दोषी यंत्रणेवर कारवाई करण्याची  मागणी कांग्रेस नगरसेवक अँड अरुण दुधनकर यांनी जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनातून केली आहे. चिमूर नगर परिषदेमध्ये ग्रामीण भागातील सात ग्राम पंचायत गावे जोडण्यात आली होती त्या अगोदर तेथील घरकुल व सिंचन विहिरीचे कामे प्रगती पथावर होती. परंतु नगर परिषद झाल्या नंतर शिल्लक देयके देणे बाकी होते लाभार्थी हे नगर परिषदेला वारंवार जाऊन त्यांचे कामे होत नव्हती. बीडीओ प.स. व  सिओ न.प. यांना त्या लाभार्थीची देयके देण्याचे आदेश करावे अशिही निवेदन मधून मागणी केली पायाभूत व नागरी सुविधा कामाची चौकशीसाठी  त्रिसद्स्यीय  समिती नेमण्याची सुद्धा मागणी करण्यात आली यावेळी नगरसेवक विनोद ढाकुंनकर, नगरसेवक कल्पना इंदूरकर, नगरसेवक गोपाल झाडे उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-29


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli