Today : 16:02:2020


नवयुवकांनी राष्ट्रसंताचे विचार आत्मसात करणे गरजेचे - जि.प. गटनेते डॉ.सतीश वारजूकर

चिमूर इंदिरा नगर येथील पुण्यतिथी कार्यक्रम
चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीतेतील विचार आजचा पिढीला देणे अत्यंत गरजेचे आहे युवकांनी विचार आत्मसात करावे. धन, संपत्ती असणे समाधान नाही तर थोडं आध्यामत आत्मसात करणे गरजेचे आहे. कोणतेही काम करीत असतांना जाहीर न करता प्रथम काम करणे महत्वाचे असल्याचे  सांगत गुरुदेवाच्या व्यासपीठावर राजकारण करु नये पुढच्या पिढीने राष्ट्रसंताच्या विचारांची गरज आहे. जि.प. चंद्रपूर येथील आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगेबाबा पुतळ्याची कल्पना माजी खासदार नरेश पुगलीया यांनी कल्पना दिली होती परंतु सत्ता नसली तरी प्रयत्न करणार असल्याचे जि.प. गट नेते डॉ. सतीश वारजूकर यांनी सांगितले.
     श्री गुरुदेव ग्रामीण विकास मंडळाच्या आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी ४९ वि च्या कार्यक्रमात जि. प. गटनेते डॉ. सतीश वारजुकर बोलत होते यावेळी कांग्रेस तालुका अध्यक्ष माधव बिरजे, नगर परिषद गट नेते अब्दुल कदिर शेख नगरसेवक तुषार काळे, नगरसेवक विनोद ढाकुणकर, ग्रामसेवाधिकारी रामदास जांभुळे, हभप प्रा. अशोक चरडे हभप खिरटकर महाराज आदी उपासक होते. 
     दरम्यान रांगोळी स्पर्धेचे बक्षिस वाटप करण्यात आले तसेच नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले होते.  तीन दिवसीय पुण्यतिथी कार्यक्रमातून सामुदायिक प्रार्थना, ध्यान, विदर्भ स्तरिय भजन स्पर्धा सहित विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी प्रा. चरडे, तालुका अध्यक्ष माधव बिरजे यांनी मार्गदर्शन केले.
     संचालन इंद्रपाल सूर्यवंशी तर प्रास्ताविक राजेंद्र मोहितकर यांनी मंडळाची मागील व पुढची वाटचाल यावर माहिती दिली श्री गुरुदेव ग्राम विकास मंडळ इंदिरा नगरचे वतीने पुण्यतिथी कार्यक्रमात शेकडो गुरुदेव उपासक उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आले श्री गुरुदेव ग्राम विकास मंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.




News - Chandrapur | Posted : 2017-11-29


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli