Today : 12:11:2019


भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या चिमूर शहर अध्यक्ष पदी आबीद रजा तर सचिव पदी फिरोज पठाण यांची अविरोध निवड

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- चिमूर येथील आमदार बंटी भांगडीया यांच्या निवासस्थानी भाजप अल्पसंख्याक मोर्चाची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीत चिमुरचे युवा कार्यकर्ते आबीद रजा यांची चिमूर शहर अध्यक्षपदी तर सचिव पदी फिरोज पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जुनेद खान यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच चिमुरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे तालुका अध्यक्ष रज्जाक सेठ, भाजप तालुका महामंत्री विनोद अढाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कलीम शेख, भाजप युवा मोर्चाचे तालुका महामंत्री आसिफ पटेल, कदिर शेख, बब्बू खान, जावाभाई शेख, मेहबूब पठाण, फहिम पठाण आदी उपस्थित होते या बैठकीत सर्वानुमते आबीद रजा व फिरोज पठाण यांची निवड करण्यात आली. 
     या बैठकीत मार्गदर्शन करताना प्रदेश उपाध्यक्ष जुनेद खान म्हणाले कि, भाजपच्या वतीने अल्पसंख्याक समाजासाठी राज्य तथा केंद्र शासनाने अनेक योजना अमलात आणल्या मात्र त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नसल्याने अनेक लोकांना त्याचा लाभ घेतांना अडचणी चा सामना करावा लागतो मात्र आता अल्पसंख्याक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विविध योजनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचव्हाव्या असे आवाहन त्यांनी केले भाजपचे तालुका अध्यक्ष दिलीप शिवरकर यांनी सुद्धा उपस्थिताना मार्गदर्शन केले.  
     या बैठकीचे संचालन भाजपा तालुका महामंत्री विनोद अढाल यानी केले तर आभार अफरोज पठाण यांनी मानले या बैठकीला तालुक्यातील  अल्पसंख्यांक मोर्चाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-11-29


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































उद्या अहेरी येथे जा