Today : 09:07:2020


दारुतस्करावर मुसक्या आवळल्या, घरात मिळाली झडतीअंती देशी दारु (चिमुर पोलिसचौकी अंतंर्गत कारवाई - भिंतीला होते विद्युत बटणावर खुलणारे प्लायवुड कपाट)

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- दारूबंदी होऊनही दारूविक्री थांबत नाही.दारूविक्रीत गब्बर झालेले दारू विकणारे नव - नवीन उपाय काढून दारू विक्री करित आहेत. चिमुर पासून ५ किलोमिटर अंतरावर मालेवाडा येथील सैराट दारु तस्कर, जगदीश रामटेके याचे घराची झडती घेतली असता चिमुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे व त्यांच्या चमूने देशी दारुच्या १७ पेट्या घरात आढळून आल्यात.
     दारु तस्कर जगदिश रामटेके याच्यावर अवैधरीत्या दारुविक्री सबंधात यापूर्वी सुध्दा ५ गुन्हे चिमुर पोलिस ठाण्यात नोंद आहेत. पोलिसांच्या कारवाईला जगदिश रामटेके जुमानत नसल्याचे आजच्या त्याच्याविरुद्धच्या ६ व्या पोलिस कारवाईवरुन लक्षात येते. जगदिश रामटेके संदर्भात तळीपार प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी सांगितले.
     जगदिश रामटेके याच्या घरी आज सकाळी ९ वाजता दरम्यान अवैधरीत्या दारु विक्री सबंधात चिमुर पोलिसांनी धाड टाकली असता, जगदिशच्या पत्नीने दारु व्यवसाय बंद असल्याचे सांगितले व घर तपासणीस अप्रत्यक्षरीत्या विरोध दर्शविला होता. परंतु चिमुर पोलिस पुर्ण तयारीनिशी आले होते. पोलिसांनी घराची कसून तपासणी केली असता, घराच्या भिंतीच्या अंदरच्या भागाला विद्युत प्रवाहावर चालणारे प्लायवूडचे कपाट तयार करण्यात आले असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. 
     या कपाटाला खोलले असता, कपाटाच्या पाहिल्या भागात किराणा माल आढळून आला, तर कपाटाच्या आंतल्या भागात १७ पेट्या देशी-विदेशी दारु साठा आढळून आला. दारुसाठा संरक्षित ठेवणारे कपाट, घराच्या भिंतीत असल्याने, जगदिश रामटेके व त्याची पत्नी बिनधास्तपणे दारु विकायची जगदिश रामटेकेची मुजोरी व दादागीरी एवढी वाढली होती कि, तो अनेक सभ्य व्यक्तींना मारहाण सुध्दा करायचा.
     माञ चंद्रपूर जिल्हा पोलिस अधिक्षक नियती ठाकर, ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी, हे दारु तस्कर जगदिश रामटेके बाबत इतंभूत माहिती घेत होते. जगदिश रामटेके बाबत सर्व माहिती संकलन केल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण परदेशी ब्रम्हपुरी यांनी, चिमुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांना जगदिशच्या दारु व्यवसायाबाबत अवगत केले आणि त्याचा दारुसाठा पकडण्याकरीता सापळा रचण्यास दोन्ही वरिष्ठ अधिकार्यानी ठाणेदार दिनेश लबडे यांना मार्गदर्शक सुचना केल्या.
     चिमुरचे ठाणेदार, जगदिश रामटेकेवर पाळत ठेवून होते व त्याचा दारुसाठा पकडण्याकरीता योग्य संधी बघत होते.आज संधी लाभली आणि जगदिशचा दारुसाठा चिमुर पोलिसांनी जगदिशच्या घरुन ताब्यात घेतला.
     चिमुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी जगदिश बरोबर त्याच्या पत्नीला आरोपी बनविले आहे. जगदिशची पत्नी पोलिसांच्या ताब्यात असून, जगदिशच्या मार्गावर ठाणेदार दिनेश लबडे आहेत व  पुढील कारवाई जगदिश रामटेके यांच्यावर करणार असल्याचे, ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकारी, प्रशांत परदेशी व चिमुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी सांगितले आहे.
     सैराट दारु तस्कर जगदिश रामटेके यांच्या मुसक्या आवळण्याच्या कामाला पोलिस प्रशासन आता वेग देणार असून आज पकडलेल्या दारुसाठ्याची किंमत ८० हजार रुपये असल्याचे सांगितले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliअहेरीत पत्रकार दिन साजरा (उपजिल्हा रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप)

2018-01-08 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली