Today : 21:02:2020


शहराचे नव्याने कर सर्वेक्षण करून न.प.उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न (VT News ला दिलेल्या मुलाखतीत नगराध्यक्षा सौ. डोहे यांचे मत)

सैय्यद मुमताज अली, गडचांदूर :- गडचांदूर शहराच्या प्रथम नागरिक बनण्याचा मान नगरवासीयांनी मला दिल्या बद्दल सर्व प्रथम मी सर्वांचे आभार मानते, यांच्या विश्वासाला मि तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देते.  मि मागील कर पाहिला असता वार्षिक चालू कर हा दरवर्षी ९० लाखांच्या जवळपास आहे. आपल्या नगर परिषद अंतर्गत माणिकगड सिमेंट कंपनी आहे, अमलनाला प्रकल्प आहे,  बि.एस.ऐन.एल., वोडाफोन, एअरटेल असे विविध प्रकारच्या मोबाईल कंपनीचे टाॅवर उभे आहे, मोठ-मोठे विद्यायालय आहे, यांची कर आकारणी पाहता येथील केवळ माणिकगड सिमेंट व मोबाईल टॉवर कडूनच न.प.ला कर मिळतो तो ही फार कमी प्रमाणात पण इतरांकडून कुठलाच कर पुर्वी पासुन घेतला जात नाही त्यामुळे न.प.चे उत्पन्न कमी आहे.
     तसेच गडचांदूर शहरातील बर्याच घरांच्या नोंदी नाही, बरीच घरे विना अकृषक जागेवर बांधलेली आहे, बरेच लोकांकडून वहिवाट कर घेतला जात नाही, शहरात अनेक शाळा असुन ते शासनाकडून दरवर्षी किराया घेतात परंतु न.प.ला कर देत नाही. या पुर्वी कधीही ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या अधिकारी अथवा पदाधिकायांनी या बाबी कडे लक्ष दिले नाही. माणिकगड़ सिमेंट कंपनीला आज जवळपास ३० ते ४० वर्ष होत आहे. परंतू त्या कंपनीचा कुठलाही सर्वे न करता सदर कंपनी व्यवस्थापकां सोबत सलोख्याचे संबंध स्थापीत करून त्यांच्या कडुन थोड्याफार प्रमाणात कर आकारणी करण्यात या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी धन्यता मानली आहे. 
     या कंपनी कडून न.प.ला अंदाजित १ कोटी पर्यंत कर न.प.ला मिळाला पाहिजे मात्र तो फक्त १० लाख ऐवढा मिळतो. दरवर्षी अंदाजे ७० ते ८० लाख रुपये प्रत्येक वर्षी लोकप्रतिनिधी व अधिकार्यानी न.प.चे नुकसान केले आहे. सी.एस. आर.फंड बाबत कधीही मागणी केलेली नाही. त्यांच्या मर्जी प्रमाणे थोड्याफार काम करायचे व येथील लोक प्रतिनीधीं तेवढ्यातच खुश असायचे. सी.एस.आर.फंड किती आणि न.प.ला दिला किती जात आहे याबद्दल कुठलाही लेखा जोखा घेण्याचे यांना सुचलेच नाही. कंपनी कडुन रितसर कर व सी.एस.आर. फंड घेतला असता तर निश्चितच भरपूर प्रमाणात या शहराला उत्पन्न मिळाले असते.
     तसेच येथील अमलनाला प्रकल्प वसाहत आहे तेथे जवळपास १०० ते २०० इतकी वसाहत असून प्रत्येक घरून वार्षिक १ हजार रूपय जरी धरले तर २ लाख रुपयचा कर बुडाला आहे. परंतु अजूनही त्यांच्या कडून कुठलाही कर घेतला जात नाही. यातून सुद्दा न.प.ला भरपूर उत्पन्न मिळाले असते.   
     आपल्या शहरात अनेक कंपन्यांनी टॉवर उभे केले आहे. त्यांच्या कडून सुद्धा फार कमी कर घेतला जातो. जर नियमा प्रमाणे यांच्या कडुन कर आकारणी केली असती तर यातून सुद्दा न.प.ला अधिकचे उत्पन्न मिळाले असते. त्याच प्रमाणे शहरातील अनेक घराला कर लावलेला नसुन काहींचा कर फार कमी लावलेला आहे. बरेच विना अकृषक मंजुरीच्या जागेवर घरे बांधून वहिवाट करीत आहे. यांना सुद्धा कर लावलेला नाही. यातून ही उत्पन्न मिळाले असते. शहरातील विद्यालयाच्या इमारती शासना कडुन किराया घेतात तर न.प.ने कर का घेऊ नये त्यांच्या कडून कर घेतल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकतो. 
     याकडे पूर्वीच्या लोकप्रतिनीधींनी जर लक्ष घातले असते तर निश्चितच दरवर्षी दिड ते दोन करोड न.प.च्या करात भर पडली असती व आज आपल्याला गडचांदूर शहर पूर्णतः विकसीत दिसला असता.आता याकडे जातीने लक्ष घालणार असून काही दिवसातच शहराच्या कर सर्वेक्षण करून न.प.चा कर जवळपास तीन पटीने वाढविण्याचा प्रयत्न आहे. असे मत नगराध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी अरविंद डोहे यांनी विदर्भ टाईम्स न्यूज़ (VT News) ला दिलाल्या मुलाखतीत व्यक्त केले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliअहेरीत पत्रकार दिन साजरा (उपजिल्हा रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप)

2018-01-08 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्य