Today : 05:07:2020


गडचांदुर तालुका संघर्ष समितीची बैढक संपन्न

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- गडचांदुर येथील महात्मा गांधी विद्यालय येथे गडचांदूर तालुका संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली अध्यक्षस्थानी प्रा. डॉ.अनिल चिताडे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संघर्ष समितीचे अध्यक्ष तुळशीराम भोजेकर, गडचांदूर न.प.च्या नगराध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी अरविंद डोहे, कॉग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, माजी जि.प.कृषी सभापती अरूणभाऊ निमजे, नगरसेविका श्रीमती मोतेवाड मॅडम, माजी प्राचार्य सुभाष पात्रीकर इत्यादींची उपस्थिती होती.
     सदर बैठकीत गडचांदूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने गडचांदूर तालुक्याच्या संघर्षासाठी नियोजीत केलेले आंदोलनाचे टप्पे, यांची माहिती देण्यात आल ८ डिसेंबर २०१७ रोजी मौजा बैलमपुर ते उपविभागीय कार्यालय राजुरा येथे पायदळ संघर्ष यात्रा १५ डिसेंबरला सायं ५ वा महात्मा गांधी चौक, गडचांदूर येथे विराट जाहीर सभा, व २२ डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनावर गडचांदूर तालुक्याच्या मागणी समर्थनार्थ भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदोलनासाठी जनजागृती करून पुन्हा आक्रमक आंदोलन करण्याच्या हेतूने सुक्ष्म नियोजन करण्यात यावे, या दृष्टीने सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
     प्रा.सुभाष पाथ्रीकर, रफीकभाई निजामी, विलास  देवाळकर, मधुकर चुनारकर, राकाॅ गटनेता तथा नगरसेवक निलेश ताजने, डॉ.के.आर. भोयर, प्रा.डाॅ. हेमचंद दुधगवळी, पत्रकार श्रीवास्तव, आशिष देवकर, मदन बोरकर, नंदु चटप इत्यादींनी तालुका विषयी मनोगत व्यक्त करत सुचना मांडल्या.तसेच मंचावर उपस्थित अरूण निमजे, नगराध्यक्षा सौ. डोहे, थिपे सर, भोजेकरजी, डाॅ. चिताडे यांचे सुद्धा उपस्थितांना सखोल मार्गदर्शन लाभले.
     प्रास्ताविक संघर्ष समितीचे सचिव अशोक कुमार उमरे, संचालन मुख्यसंघटक उध्दव पुरी व आभार समितीचे सहकारी रफीक शेख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, पत्रकार बंधुंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
मुलचेरा, गणेश गोरघाटे :-
  मुलचेरा येथील स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयात येथे आज दि