Today : 09:07:2020


भूखंड मिळविला मात्र उद्योग उभारला नायं (सिंदेवाही तालुका उद्योगाविनासुशिक्षित बेरोजगारीत वाढ)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही तालुका उद्योग विरहीत तालुका म्हणून ओळखला जातो.तालुक्यातील बहुतेक जनता शेती व्यवसायच्या भरोवश्यावर उपजिविका साधतात. शेती हंगामाच्या चार महीण्याच्या कालावधी नंतर सिंचन सुविधेअभावी कामाविना असतो. तसेच रोजगाराविना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे .शासन स्तरावरून तालुकाच्या ठिकाणी मोठा उद्योग उभारत नसल्याची खंत सुशिक्षित बेराजगारात व्यक्त केली जात आहे. 
     सिंदेवाहीत उद्योगासाठी भूखंड निर्धारित केला आहे. तेथे बर्याच वर्षापासून मोठा उद्योग उभारला गेला नाही. त्या भूखंडाची जागा काही जणांनी लिजवर घेतली असल्याचे बोलले जाते .त्यामुळे या ठिकाणी भूखंड मिळवीला मात्र उद्योगच उभारला नायं, अश्या अवस्थेचे चित्र पहावयास मिळत आहे.
     धान उत्पादन करणारा तालुका म्हणून सिंदेवाही तालुक्याची ओळख आहे. मात्र आज घडीला शेतकरी, मजूरांची अवस्था बिकट आहे.चार - पाच महीण्याच्या हंगामानंतर रोजगार मिळवीणे कठीण झाले. बारमाही सिंचन सुविधेअभावी शेती व्यवसाय ड्बघाईत आलेला आहे .सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी मोठया उद्योगाची नितांत गरज आहे . गाव खेडयात व्यवसायाची परिस्थिती बिकट झाली आहे . "ग्राहक कम,धंदेवाले ज्यादा " असे म्हणण्याची पाळी व्यवसायिकांवर आली आहे . सुशिक्षित तरुण पदवी हातात घवून "मला कुणी ,नोकरी देता नोकरी ? अशी ओरड करण्याची वेळ आली आहे.काही सुशिक्षित तरुण रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहेत तर काही तरुण शहरात कमी पगारामुळे रोजगार परवडण्या जोगे नसल्याचे कारण पुढे करत "गडया आपला ,गाव बरा " शहरातून गावात परतत आहेत आणि गाव परिसरातील काही तरूण बेरोजगारीमुळे झटपट पैसा कमाविण्याच्या नादात वाम मार्गाला जात आहेत. रोजगार देण्यासाठी ग्रामिण भागात तालुका स्तरावर मोठा उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे.
     सिंदेवाही एम आय डि सी करिता जागा निर्धारित केली असली तरी आज त्या जागेवर एक, दोन बोटावर मोजण्यालायक छोटे उद्योग व्ययक्तिक उभारले गेले आहे. त्या एम आय डी सी चा बोर्ड सुध्दा गायब असल्याचे दिसून येते. काहींनी उद्योग उभारणी करिता त्या एम आय डी सी तील जागेचा भूखंड मिळवीला. मात्र उद्योगच उभार नाही. अशी अवस्था निर्माण झाल्याचे पहावयास पहावयास मिळत आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या हाताता नियमित काम कसा आणि केव्हा मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक्षल चकमकीत १ जवान गंभीर (व

2018-01-08 | News | Gadchiroli