Today : 17:11:2019


भिसी प्राथमीक आरोग्य केन्द्र बनले अवैध पार्कींग चे ठिकान

चिमुर, पंकज मिश्रा :- भिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील गावांमधून तसेच गावातील अनेक रुग्ण येतात. इथे येणारे रुग्ण साधारणतः स्वताःच्या वाहणाने इथे येतात. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संरक्षण भिंतीच्या आत याच परिसरातील काही व्यवसायीक स्वताःच्या मालकिचे खाजगी तसेच मालवाहक वाहने ठेवतात त्यामुळे इथे येणाऱ्या रूग्णांना आपली वाहने उभी करप्यात अडचन निर्माण होत असुन नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
     भिसी गावाची लोकसंख्या २० हजारावर आहे. भिसी प्राथमिक आरोग्य केंद्राचे परिसरातील गावांमध्ये ७ (सात) उपकेन्द्र आहेत. परिसरातील ३० ते ३५ गावांमधील विविध आजाराने ग्रस्त रुग्ण या ठिकाणी उपचाराकरीता येतात. या ठिकानी सकाळी व सायंकाळी असे दोन वेळा रूग्णांची तपासनी केल्या जाते. तसेच या ठिकाणी अनेक रूग्ण भरती सुध्दा असतात. बाहेरून येणारे रुग्ण तसेच भरती असलेल्या रूग्णांना भेटायला येणारे परिचीतांची संख्या भरपुर प्रमाणात असते, त्यामुळे आरोग्य केंद्राच्या पटांगणात दुचाकी वाहणांचा खच पडलेला असतो. परंतु या परिसरातील काही रेती, गिट्टी, मुरुम, विटांचा पुरवठा करणारे व्यवसायीक आपले ट्रॅक्टर, ट्रक सारखे जड वाहने आरोग्य केंद्राच्या पटांगणात ठेवतात. या जड वाहणांमुळे आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाहीकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
     या संदर्भात प्राथमीक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिध्दार्थ गेडाम यांना विचारना केली असता त्यांनी सांगीतले कि ट्रॅक्टर, ट्रक मालकांना अनेकदा सुचना दिल्या परंतु राजकिय वरदहस्त असलेल्या या व्यवसायीकांनी मुजोरीने आपली वाहने प्राथमीक आरोग्य केंद्राच्या पटांगणात ठेवतात. यानंतर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समार्गदर्शनात या वाहन मालकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :- 
भद्रावती जागतिक पारायण समिती मागील दोन वर्षांपासून भद्रावती मध्ये गजानन महाराज यां..