Today : 20:09:2019


व्यंकटरावपेठा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचा भोंगळ कारभार

अहेरी, प्रतिनिधी :- अहेरी तालुक्यातील ५ कि.मी. अंतरावर असलेल्या व्यंकटरावपेठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक पदावर असलेल्या बी.एन.पंधरे हे गावकर्यांसोबत खोटे बोलतात व असभ्य व्यवहार करतात.व तसेच मध्यप्राशन करून शाळेत येत असतात त्यामुळे शाळेतील विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक बाबी पूर्ण करण्यास त्रास होत असल्याने त्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व तसेच बि.एन.पंधरे हे गावात सुध्दा शाळेच्या वेळेवर फिरत दिसतात अश्या वेळी त्यांना गावकर्यांनी विचारणा केली असता गटशिक्षणाधिकारीसाठी वाढईकडे बनत असलेल्या पलंग साठी जात आहो असे ते सांगतात.
     तसेच गावातील एकही विद्यार्थीला गणवेश मिळाले नाही असे विचारले असता बँकेत जमा झालेले आहे असे खोटे सांगून अहेरीत बँकेत जाण्यास सांगतात पालक बँकेत गेल्यानंतर पैशे न मिळाल्याने परत विचारणा केल्यास बँकेचे पासबुक फेकून तुम्हाला ते करून घ्या अश्या प्रकारचे गैर वागणूक करतात. शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे दोन वर्षांपासून एकही बैठक झालेली नसून जुनी समितीचे अद्यापही बदल करण्यात आलेले नाही म्हणून शासन तर्फे मिळणाऱ्या योजना पासून व्यंकटरावपेठा येथील विद्यार्थी वंचित आहे.
     शासनाच्या नियमानुसार शाळा व्यवस्थापन समितीची वर्षातून सहा वेळा बैठक होणे गरजेचे असते अश्या अनेक समस्या या निवेदनात म्हटले आहे. व्यंकटरावपेठा शाळेतील समस्या मार्गी लावा म्हणून आज गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कांकडालवार यांना निवेदन  देण्यात आले.
या नंतर आपण दिलेल्या निवेदनाच्या योग्यती चौकशी करून दोषींवर हवी ती कार्यवाही करण्यात येईल गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी म्हटले. 
     यावेळी व्यंकटरावपेठा येथील ग्राम पंचायत सरपंच संपतराव सिडाम, संतोष व्यंकटी पालक, बजरंग मडावी पालक, शामराव कुमरे पालक, शंकर सिडाम ग्राम पंचायत सदस्य, शंकर करमे, रेखा सडमेक हे निवेदन देतांना उपस्थित होते. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गज