Today : 21:11:2019


चिमूर येथे ईद-ऐ-मिलादुन्नबी उत्साहात साजरा मक्काची झाकी ठरली विशेष आकर्षण

फिरोज पठाण, चिमूर :- मुस्लिम समाज बांधवांच्या श्रद्धास्थान असलेले हजरत मोहम्मद पैगम्बरजगातील पहिले व्यक्तीमत्व आहेत कि, ज्यांनी इतिहासात पहिल्यांदा समतेचा व्यावहारिक संदेश दिला. केवळ २३ वर्षाचा कालावधीत  त्यांनी या समतेवर आधारित समाज स्थापन करून जगाला दाखविला त्यांची जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. सकाळी १० वाजताच्या सुमारास मक्का-मदिनाची झाकीसह विविध धार्मिक देखाव्यासह स्थानीक रज़ा सुन्नी मस्जिद पासुन भव्य दिव्य विशाल रॅलीची सुरूवात करण्यात आली. 
     यात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी चिमुकल्यांचा उत्साहपूर्ती, आणि त्यांचा पेहराव डोळे दिपविणारा होता. देखो मेरे नबी की शान बच्चा बच्चा है कुर्बान, पत्ती पत्ती फुल फुल - या रसूल या रसूल नारे देत मुख्य मार्गाने शहर भ्रमण करीत शांत वातावरणात रज़ा सुन्नी मशिदीत रैलीचा समारोप करण्यात आला. शहरातील हिंदु बांधवांनी, मुस्लिम बांधवांना सणानिमित्य शुभेच्छा देऊन एकतेचे दर्शन दिले. मुख्यमार्गावर असलेले भाजपा कार्यालय येथे लहान बालगोपालांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
     रजा सुन्नी मस्जिदचे शाही  इमाम तंजील रज़ा यांच्या मार्गदर्शनात, मस्जिद चे सदर कलीम पठाण, सेक्रेटरी अफरोज पठाण व नवंजवाने युवकांचा उपस्थित मुस्लिम बांधवांनी विशेष प्रार्थना करून एकमेकांना पैगम्बर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ठाणेदार दिनेश लबडे व त्यांचे सहकाऱ्यांनी मुख्य महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur