Today : 14:11:2019


पिपर्डा येथे विश्व एड्स सप्ताह, आरोग्य तपासणी, उपचार व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

सैय्यद मुमताज अली, गडचांदूर :- आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व अंबुजा सिमेंट फाऊंडेशन च्या वतिने आमदार आदर्श गाव पिपर्डा येथे संसर्गजन्य रोग निदान उपक्रमा अतंर्गत क्षयरोग, मधुमेह, रक्तदाब व एच आय व्ही रक्तचाचणी करुण, संसर्गजन्य रोगां पासून संरक्षण निगा आणि उपचार करण्यासाठी तपासणी व मार्गदर्शन उपचार शिबीर घेण्यात आले. यामध्ये मोठ्या सख्येने गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
     कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सामाजीक नेते सय्यद आबीद अली, हे होते तर शिबिराचे उदघाटन सरपंच चंद्रभान तोडासे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी तज्ञाकडून तपासणी  उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. गावात स्वच्छता घरे, शासकीय कार्यालय परिसर, घनकचरा, शौचखड्डे, सांडपाण्याचे व्यवस्थापन झाल्याने वर्षभरात गावात डायरिया, मलेरिया व डासमुक्त परिसर, गाव आजारा पासून मुक्त तसेच स्वच्छतेचे धडे प्रत्येक व्यक्तीने गिरविल्याने आजार दुर गेले. 
     तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी रुग्णांनी आजार न लपवता तपासणी करून मनातील शंका काढून घ्यावी तसेच बल्लारपूर येथे नामदार सुधिर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन लाईफ लाईन एक्स्प्रेस, निशुल्क तपासणी उपचार व शस्त्रक्रिया दंत कॅन्सर, कानाचे आजार ईत्यादी तपासणी शस्त्रक्रीया, तज्ञ डाँक्टर १९ डिसेंबर पर्यंत सेवेत आहे. याचा लाभ ग्रामीण जनतेनी घ्यावा, शासन आरोग्य सेवा जनतेच्या दारात पोहचवित असून आरोग्य विभागाच्या १०८ ,१०४ या सेवेमुळे हक्काचा उपचार मिळत आहे. सर्वसामान्यांनी शिबिरात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
     यावेळी जिवतोडे, थिपे, गेडाम, कल्पना मैडम, तज्ञ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी फाऊंडेंशन चे कर्मचारी, गावच्या महिला व पुरुषांनी सहभाग घेऊन शिबीराचा लाभ घेतला.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli