Today : 17:02:2020


रिसोडला रविवारी मोफत भव्य रोगनिदान शिबिर

"निवडक शिबिरार्थींचा पुढील उपचार अत्यल्प दरात, ब्रह्मा कुमारी विद्यालय व डॉक्टर्स असोसिएशनचे आयोजन"
प्रतिनिधी महेंद्रकुमार महाजन जैन, रिसोड :- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रिसोड, डॉक्टर्स असोसिएशन रिसोड व वत्सल हॉस्पिटल तसेच  रिसर्च फाऊंडेशन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने अगदी मोफत भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन रविवार दि ३ डिसेंबर ला सकाळी १० ते ४ या वेळेत स्थानिक श्री बाबासाहेब धाबेकर कला व वाणिज्य महाविद्यालय रिसोड येथे करण्यात आले आहे. 
     शिबिरातील निवडक रुग्णांचा पुढील उपचार अत्यल्प दरात करण्यात येणार आहे हे या शिबिराचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये मेंदू, मणका, अपेंडिक्स, हर्निया, हाडासंबंधी, गर्भाशय इत्यादी शस्त्रक्रिया (ऑपरेशन) तसेच दंत विकार, नेत्ररोग संबंधित उपचार चा समावेश असणार आहे. गर्भवती मातांकरिता गर्भ संस्कार मार्गदर्शन अकोला येथील तज्ञ डॉ मिनाक्षी मोरे यांच्याकडून मिळणार आहे. गर्भ संस्कार मार्गदर्शन गर्भवती माता व बाळ या दोहोंच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
     शिबिराला अकोला व वाशिम येथील तज्ञ डॉक्टरांचा चमू उपस्थित राहणार असून रिसोड तालुक्यातील सर्व डॉक्टर्स रुग्णाच्या सेवेकरिता उपस्थित राहणार आहेत तसेच ब्रह्माकुमारी ज्योती दिदींच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मा कुमारी विद्यालयाचे ज्ञानार्थी सेवा देणार आहेत. तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थ्यांचा विशेष सहकार्य असणार आहे. तज्ञ डॉक्टर्स मध्ये अकोला येथील प्रसिद्ध डॉ अरुण भागवत शल्य चिकित्सक, यकृत, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, मूळव्याध, ऑपरेशन तज्ञ, डॉ कल्पना भागवत स्त्रीरोग तज्ञ, डॉ उल्हास घोटकर मधुमेह तज्ञ, डॉ नरेंद्र भागवत न्यूरो सर्जन, डॉ नम्रता भागवत दुखणे निवारण तज्ञ, डॉ आर आर कांबे दंतरोग तज्ञ, डॉ शशिकांत मोरे, डॉ मिनाक्षी मोरे गर्भ संस्कार तज्ञ, डॉ अभिषेक भागवत पोटाचे विकार तज्ञ, डॉ हिता भागवत डोळ्यांचे विकार व ट्रान्सप्लांट उपचार, डॉ संजीवनी जवादे व्यसनमुक्ती तज्ञ, डॉ दिनेश राठी फिजिशियन तर वाशिम चे डॉ विवेक साबु  अस्थीरोग तज्ञ, डॉ शुभांगी साबु स्त्रीरोग तज्ञ, डॉ ज्ञानेश्वर डाळ अस्थीरोग तज्ञ इत्यादींची उपस्थिती राहणार आहे.
     शिबिराकरिता रुग्णांची नोंदणी डॉक्टर्स असोसिएशनच्या सर्वच डॉक्टर कडे सुरू आहे. या शिबिराचा लाभ अधिकाधीक रुग्णांनी करून घ्यावा असे आव्हान प्रजापिता ईश्वरीय विद्यालय संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती दिदी व डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सुभाषचंद्र बबेरवाल, सचिव अरुण देशमुख, जेष्ठ डॉक्टर डॉ दिलीप धोपे, डॉ रमेश साबू, डॉ विजय प्रसाद तिवारी, व शिबिर समनव्यक रवि अंभोरे व ब्रह्माकुमारीज परिवार रिसोड यांनी केले आहे.
News - Editorial | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक्षल चकमकीत १ जवान गंभीर (व

2018-01-08 | News | Gadchiroli

" जखमी जवानाचे नाव