Today : 17:02:2020


जिल्हा परीषद शाळा, कान्हाळगाव येथे विज्ञान प्रदर्शनी व अपूर्व मेळावा संपन्न

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- कोरपना तालुक्यातील कान्हाळगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे विज्ञान प्रदर्शनी व अपुर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यामातुन विविध प्रयोग करुन उपस्थितांना मंञमुग्ध केले.
     कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा कान्हाळगावचे उपसरपंच नारायण हिवरकर होते तर उदघाटन सरपंच विनोद नवले यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष किशोर मालेकर, वर्गणे, जिवतोडे, मडावी, कायरकर हे शिक्षकांसह मडावी मँडम आदी मान्यवरांची उपस्थिती होतीे.
     विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या प्रदर्शनाचे कौतुक करत, शाळेत अशा प्रकारे कार्यक्रमाचे सादरीकरण होने काळाची गरज बनली असुन या माध्यमातुन विद्यार्थी घडत असतो असे मनोगत हिवरकर यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या आयोजना बद्दल शिक्षकांचे सुद्धा कौतुक केले. वर्गणे सर यांनी जिल्हा परीषद शाळेला अनेक वर्षा पासुन मोलाचे सहकार्य करुन अनेक विद्यार्थी घडविले त्यांचे सुद्वा कौतुक करत सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली साठी हिवरकर यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी सुद्धा या निमीत्ताने आपले मनोगत व्यक्त केले.
     कार्यक्रमाला नागरीक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन वर्गणे, आभार जिवतोडे सर यांनी मानले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्य..