Today : 06:07:2020


माना समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार - आ.किर्तीकुमार भांगडिया

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- माना समाजाचा जात वैधता प्रश्न १९८५ पासून प्रलंबित असून हा प्रश्न जो पर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत मैदान सोडणार नाही अशी ग्वाही चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी दिली ते माना आदिम जाती जमात मंडळाद्वारे चिमूर येथे आयोजित नागदिवाळी कार्यक्रमात बोलत होते. 
     यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतभाऊ वारजूकर, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, माना आदिम जमात मंडळ, मुंबईचे कार्याध्यक्ष दामोधर केदार, माजी प.स.सभापती प्रकाशभाऊ वाकडे, मंडळाचे मार्गदर्शक भाऊरावजी दांडेकर, सचिव विजयकुमार घरत, जि.प.वर्धा सदस्य रोशन चौखे, माजी जि.प. सदस्य मंदाताई चौधरी, नगरसेविका भारती जांभूळे, हेमलता नन्नावरे, सुखदेव रावजी ढोणे, भाजपा ओबीसी आघाडी तालुका प्रमुख बकारामजी मालोदे, तालुका महामंत्री विनोद अढाल, मनीष तुमपल्लीवार, सुनील किटे, माना आदिम जमात मंडळाचे तालुका प्रमुख वासुदेव श्रीरामे आदि प्रामुख्याने उपस्थित होते. ते पुढे म्हणाले कि, माना समाजाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. 
     मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे हा विषय लाऊन धरला असून त्यांनी या विषयावर मंत्री गटाची एक समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल येई पर्यंत त्यांनी थांबायला सांगितले आहे. चिमूर येथे मानकादेवी मंदिरासाठी जागा मिळवून देणार असून मुक्ताई मंदिर परिसराचा विकास पर्यटन स्थळ म्हणून गोंदोडा व आंबोली चौरस्ता प्रमाणे करण्यात येईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli