Today : 23:02:2020


आज दिसणार (सुपरमून)

विदर्भ टाइम्स न्यूज / आज रविवारी 3 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात 'सुपरमून' दिसणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली. रविवार ३ डिसेंबर रोजी श्रीदत्तजयंती आहे. या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी पूर्वेला पौर्णिमेचा चंद्र रोहिणी नक्षत्रात असताना उगवेल. यामुळे खगोलप्रेमींना चंद्रदर्शनासह अभ्यासाचीही संधी मिळणार आहे.
     पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला 'सुपरमून' म्हटले जाते. 'सुपरमून'वेळी पौर्णिमेचे चंद्रबिंब नेहमीपेक्षा सुमारे चौदा टक्के मोठे आणि सोळा टक्के जास्त तेजस्वी दिसते. सन १९७९ मध्ये रिचर्ड नोले यांनी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीजवळ आलेल्या चंद्रास सर्वप्रथम 'सुपरमून' असे नाव दिले.
     मार्गशीर्ष पौर्णिमा रात्री ९ वाजून १ मिनिटांनी पूर्ण होईल. त्यावेळी चंद्रबिंब नेहमीपेक्षा जास्त मोठे व तेजस्वी दिसेल. संपूर्ण भारतात रात्रभर आकाशात दर्शन देऊन चंद्र सोमवारी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी मावळेल. रविवारी रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी पूर्व आकाशात सर्वांना साध्या डोळ्यांनी सुपरमूनचे दर्शन घेता येईल. सुपरमूनचे फोटो काढण्यासाठी छायाचित्रकारांना ही एक पर्वणी असेल.
credit by letsup
News - Editorial | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur