Today : 06:07:2020


गिट्टी चुरी घोटाळयाची सारवा सारव सभेची दिशा भूल करून प्रतीब्रास दर सांगून क्विबीट दर मंजूर : विरोधकांनी केला परदा फाश

चिमूर, प्रतिनीधी :-  सभेची दिशाभूल करून अतिरिक्त दर देयके अदा करण्याचे काम चिमूर येथे करण्यात आले आहे. तसेच प्रती ब्रासचे दर सांगून क्यूबिक  मिटरचे दर मंजूर करण्यात आले असा गौप्य स्पोट झाल्याचे स्थानिक नेत्याने सांगितले आहे. चिमूर नगर परिषद अंतर्गत मुरुम, चुरी, गिट्टी, पुरवठा करण्याविषयी निवीदा ६ जुन २०१७ च्या सभेत मांडण्यात आले. सभेत उपस्थीत सभासदांना या साहित्य पुरवठ्याचे दर प्रती ब्रास प्रमाणे सांगण्यात येऊन प्रत्यक्ष १३ लाखावर देयके घन मिटरचे दर लावुन देण्यात आल्याने सभेची दिशाभुल करून जादा दराने देयके अदा करण्यात आली असून दोषींची चौकशी करून कार्यवाही करण्याची नोंद ठरावात करवून घेऊन सत्ताधारकांची सारवा सारव पाडली आहे.
     पावसाळ्यात चिखल किंवा इतर कारणाने रहदारी करीता सुलभता व्हावी याकरीता चिमूर नगर परीषद क्षेत्रात मुरूम, चुरी व गिट्टी पसरविण्यासाठी अर्थसंकल्पीय अदांजपत्रकात ५ लाखाची तरतुद करण्यात आली. त्याप्रमाणे निविदा मागविण्यात आल्या. या निविदांना मंजुरी देण्याकरीता ६ जुन २०१७ ला झालेल्या सभेत ठेवण्यात आले. सभेत निवीदाकरीता लागणाऱ्या दस्ताएवजाची पुर्तता झाली नसतांनाही योग्य दस्ताऐवज असल्याचे खोटे सांगण्यात आले. तसेच सभेच पुरवठयाचा दर हा ब्रास प्रमाणे लावण्याचे सांगण्यात आले, मात्र कंत्राटदारास देयके देतांना घन मिटर प्रमाणे १३ लाख १२ हजार १६२ रूपये अदा करण्यात आले.
     निविदा मधील सत्य बाहेर आल्याने झालेल्या अनियमीतता आणि नगर परिषदेच्या झालेल्या नुकसानाची चौकशी करून कार्यवाही करण्याविषयी तक्रार विरोधी नगरसेवकांनी मुख्यमंत्री आणि जिल्हयाधिकाऱ्यांना केल्यामुळे सत्ताधाऱ्या्कडून सारवा सारव करण्याकरीता धावपडीचा भाग म्हणुन २७ नोहेंबरला २ डिसेबंरच्या मासिक सभेकरीता काढलेल्या नोटीस मध्ये विषय क्रमांक ६ मध्ये हि निविदा कमी करण्या बाबत कौन्सीलच्या विचारार्थ आणि निर्णयार्थ ठेवण्यात आला. 
     या सभेत संख्याबळ समसमान असल्याने विषयाच्या अनुशंगाने निविदा कमी करण्यापुर्वी झालेल्या अनियमितता करण्यात जबाबदार प्रत्येकावर कार्यवाही करण्याविषयी तसेच कंत्राटदारास काळया यादीत टाकण्याचे विरोधकांची मते नोंदविण्यात येऊन ठरावाची प्रत देण्याची लेखी मागणी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना करण्यात आली.  त्याप्रमाणे नोंद झाल्याने सत्ताधाऱ्यापुढे मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. सभेस कॉंग्रेस गटनेता अ.कदीर शेख, अॅड.अरूण दुधनकर, गोपाल झाडे, कल्पनाताई इंदुरकर, श्रद्धा बंडे, सिमा बुटके, उमेश हिंगे या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले असून स्विकृत नगरसेवक विनोद ढाकुणकर यांनी यात महत्वाची भुमिका बजावली आहे.
     सत्ताधारकांनी विषयाला मंजुरी दिली तर विरोधकांनी नामंजुर असल्याचे सांगून सत्ताधाऱ्यांनी केलेल्या पापात आम्ही सहभागी होऊ शकत नाही असे बजावले. सभेत सत्ताधारी आणि विरोधकांची समसमान सात सात संख्या असल्याने विषयाला बगल देण्यात आली. त्यामुळे झालेल्या अनियमीततेची चौकशी करून कार्यवाही करण्याचे मत ठरावामध्ये नोंद घेण्यात आले आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
निकृष्ट बांधकाम पुन्हा उत्कृष्ट करणेसाठी झोपा क़ाढा (ठिय्या) आंदोलन

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
मूल
, दीपक देशपांडे :-  नगर परिषद मूल क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये सोमनाथ मार्गावर केलेले नाल..