Today : 11:07:2020


समाज कार्याचे विद्यार्थी धडकले प्रशासकीय कार्यालयावर

फिरोज पठाण, चिमूर प्रतिनिधी :- सरकारच्या अधिनस्थ असलेल्या विभागाच्या अंतर्गत समाजाची बाजू भक्कम करणाच्या दृष्टीकोनातून समाजकार्य शिक्षणाची सुरुवात करण्यात आली यांची जबाबदारी समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागाकडे सोपविण्यात आली. मात्र सरकारने नवीन अध्यादेश काढल्याने समजाकार्य पारंगत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डावलून इतर अभ्यासक्रमवर विद्यार्थ्यांना प्राधान्य दिल्याने विविध विभागातील पदभर्ती पासून समाज कार्याचे विद्यार्थी वंचित राहणार आहे. 
     त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समजाकार्य विद्यार्थ्यांना जनआक्रोश रॅली काढून आपल्या न्यायक हक्काच्या मागण्या व समाजकार्य शिक्षणची पदभरतीची पात्रता कायम ठेवण्याच्या दृष्टीकोनातून चिमूर येथील आज आजी-माजी सहकार्य अन्यायग्रस्त विद्यार्थी कृती समिती प्रशासकीय कार्यालयावर धडकले.
     सरकारने २१ जुलै २०१७ रोजी विविध विभागातील पद भरती संबंध समाजकार्य शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतरही अभ्यासक्रमतील विद्यार्थी पदविधारक आदिवासी, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, आरोग्य कामगार विभागाच्या आदी पदभरतीसाठी पात्र असल्याचा अध्यादेश काढून यावर सरकारने निर्णय घेतला. त्यामुळे समाजकार्य पारंगत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकार विरोधात असंतोष पसरला आहे. सरकारच्या अधिनस्थ समाजकार्य शिक्षणाशी निगडित असलेल्या विविध विभागातील पद भरतीसाठी समाजकार्य शिक्षणाची पात्रता कायम होती. तिचे पात्रता पूर्ववत करण्याच्या दृष्टिकोनातून समाजकार्य विद्यार्थ्यांनी आपले भविष्य आपल्या हाती आणि लढा फक्त न्यायासाठी अशा घोषणा देत हुतात्मा स्मारक येथून आक्रोश रॅली काढत विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश येरमे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समाजकल्याण मंत्री राजकुमार वढोले, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन पाठविण्यात आले. 
     निवेदन देतांना शिष्टमंडळा आजी माजी समाजकार्य अन्यायग्रस्त विद्यार्थी कृती समिती व सन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश येरमे, सचिन जुगडे, अमोल मोडक, गोकुल सीडाम, सोमेश्वर घुटे, राहुल मडावी, अक्षय लांजेवार, शशिकांत चाटे, गिरीश बांगडे, प्राजक्ता टेभूरकर, स्वप्नील मजगवडे, प्रतीक शेंडे, नागो टापरे, स्वप्नील भुसारी, उत्कर्ष मोटघरे, पूजा रामटेके, शितल पारधी, मेघा चायरे, सपना शेंडे, अरविंद सालवटकर, पूनम खंडारे, व आदी उपस्थित होते.

चुंनीलाला कुडवे, माजी विद्यार्थी एम.एस.डब्ल्यू. 
     "समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी पारंगत झाल्यावर थेट समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचतो व सेवा घेतो. मात्र इतर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांत असे दिसून येत नाही. समाजकार्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती सरकारने घेतलेल्या निर्णय अन्यायकारक आहे. समाजकार्यच्या विद्यार्थ्यांचा खिल्ली उडविणाऱ्या प्रकार असून एकाप्रकारे सरकार विद्यार्थ्यांचे अवहेलना करीत आहे"

धनश्री मेंढुरकर, माजी विद्यापीठ प्रतिनिधी एम एस डब्ल्यू 
     "विद्यापीठ अभ्यासक्रमातील समाजकार्य शिक्षण हे व्यावसायिक शिक्षण आहे, या शिक्षणाचा उपयोग विविध क्षेत्रात होते, हेच समाजकार्याचे विध्यार्थी समुदायात जाऊन काम करतात  व विविध घटकांशी संवाद साधतात. इतर अभ्यास क्रमातील पदवीधारकांना समाज कार्य क्षेत्राला जोडून सरकार प्राधान्य देत असेल तर समाजकार्य शिक्षणाचे महत्व राहणार नाही त्यामुळे अनेक कायम स्वरूपी पदासाठी समाजकार्याची पात्रता लागू करावी."

गणेश येरमे, अध्यक्ष सन विध्यार्थी संघटना चिमूर
     "अनेक शाखांमध्ये  पदवीधारकांचा आदिवासी विकास, सामाजिक समस्या, समाजकल्याण प्रशासन आदी विषयांबाबत दुरान्वये संबंध आलेला नसतो. त्यांच्या आदिवासींच्या प्रश्नाबाबत संवेदनशिलता अभावानेच असते. अन्य पदवीधरांना आदिवासी समुदायासोबत काम करण्याकरिता आवश्यक तंत्र, कौशल्य ही नसते. त्यामुळे शासनाचा चुकीचा आणि गैरवादवी निर्णय आहे."
News - Chandrapur | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
गिरगाव पांदन रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर ब