Today : 11:07:2020


दारुविक्रेता पती फरार तर पत्नी तुरुंगात (मालेवाडा येथील दारु व्यवसायीक सबंधातील घटना)

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- चिमुर - तालुक्यातील मालेवाडा येथे जगदीश रामटेके हा मागील काही वर्षापासून अवैधरीत्या दारु विकण्याचा धंदा करीत होता. अनेकदा चिमुर पोलिसांनी त्याच्यावर अवैधरीत्या दारुविक्री संदर्भात कारवाई केली. परंतु पोलिस कारवाईला न जुमानता परत जगदीश रामटेके जोमात दारु विकण्याचा धंदा करायचा व त्याच्या दारुविक्री व्यवसायाला त्याची पत्नी सहकार्य करायची. 
     यामुळे चिमुर पोलिस, जगदीश व त्याच्या पत्नीच्या मागावर होती. दि.१ रोज शुक्रवारला चिमुर पोलिसांनी, मौजा मालेवाडा येथील जगदीशच्या घराची झडती घेतली असता १७ पेट्या देशी दारु आढळून आली. यामुळे जगदीश रामटेके याच्या गैरहजेरीत त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले व पतीपत्नीवर गुन्हा नोंद केला. जगदिशच्या पत्नीला चिमुर कनिष्ठ न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते. यात न्यायालयाने जगदीशच्या पत्नीला जमानत न देता चंद्रपूर कारागृहांमध्ये तिची रवानगी केली. आजच्या स्थितीत पत्नी कारागृहांमध्ये तर पती फरार आहे.
     जगदीश रामटेके हा अवैधरीत्या दारु व्यवसाय करीत असतांना, दारु धंद्याच्या नादात तो अनेकांना धमकवायचा व सभ्य व्यक्तीना मारहान सुद्धा करायचा. जगदिशने गावातील वातावरण अशांत व भिती युक्त केले होते. त्याची मुजोरी आणि दादागिरी तर बेलगाम झाली होती. यामुळे गावातील अनेक महिला व पुरुषांना, जगदीशच्या कृतीचा व वृत्तीचा भयानक ञास व्हायचा.जगदीशच्या अवैध व्यवसायातंर्गत मुजोरी सबंधात पोलिसांना अवगत केले होते. अखेर चिमुर पोलिसांनी त्याचा मुसक्या आवळण्याबाबत त्याच्या घरी धाड टाकीत, दारुसाठा जप्त केला व जगदीशच्या पत्नीला ताब्यात घेतले.
     आज पत्नी चंद्रपूर कारागृहांमध्ये आहे तर, जगदीश फरार आहे. अटकपूर्व जमानतीसाठी जिल्हा सञ न्यायालयात अर्ज करनार असल्याची माहिती आहे. याच बरोबर तो पत्नीच्या सुटके बाबत धडपडत आहे. परंतु चिमुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे, नेमकी काय भुमिका जगदीश बाबत घेतात यावर जगदीश व त्याच्या पत्नीची जमानत अवलंबून असणार आहे.  
News - Chandrapur | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-
 नवरगाव पासून एक