Today : 06:07:2020


शंकरपुर परिसरात दारूची अवैध विक्री जोरात पोलीस विभाग झोपेत

पंकज मिश्रा, भिसी (चिमूर) :- चंद्रपुर जिल्ह्याच्या टोकावर असलेले शंकरपुर गांव भंडारा व नागपुर जिल्ह्याच्या सिमेलगत आहे. चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासुन परजिल्ह्यामधुन दारूची तस्करी मोठयाप्रमाणात होत आहे. शंकरपुर गावात तसेच परिसरात दारूची अवैध विक्री खुलेआम सुरू असुन येथील पोलीस विभाग मात्र गाढ झोपेत आहे.
     चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासुन अवैधरित्या दारू विकणाऱ्यांचे प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. भिसी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शंकरपुर येथे एक पोलीस चौकी आहे. या पोलीस चौकी अंतर्गत २८ गांव येतात. शंकरपुर गावावरुन काही अंतरावरच भंडारा व नागपुर जिल्हयाच्या सिमा असल्यामुळे इथे देशी, विदेशी तसेच मोहफुलाची दारूची तस्करी सहजरित्या करून ती,  दारूशौकिनांना सहज उपलब्ध करून दिल्या जात आहे. शंकरपुर लगत असलेल्या कवडशी (देश), हिरापुर, आंबोली, डोमा, मांगलगांव, चकजाटेपार व इतर गावांमध्ये दारूविक्रेत्यांची एकून संख्या १०० पेक्षा जास्त असुन यात युवकांचा प्रमाण जास्त आहे. अवैध दारूविक्रिच्या या धंद्यात महिण्याकाठी लाखों रूपयाची उलाढाल होते.
     मागील काही महिण्याआधी शंकरपुर व परिसरात दारू विक्रीचे प्रमाण कमी झाले होते, परंतु येथील पोलीस चौकीच्या काही कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांची राजकिय दबावात बदली करण्यात आली, व परत दारूविक्रेत्यांचे मनोबल वाढले व दारुविक्री मोठया प्रमानात सुरु झाली.
     येथील पोलीस चौकी अंतर्गत २८ गांव येतात, परंतु यासाठी चौकीत फक्त दोनच कर्मचारी आहेत. याचाच फायदा अवैध दारूविक्रेते घेतात व राजरोसपणे खुलेआम दारूविक्री करतात. परिसरातिल गावांमध्ये पोलिसांमार्फत "ग्राम मुक्ती दल" "दारूबंदी समिती" या सारखे गट तयार करण्यात आले पण त्यांना पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने त्या गटांचे मनोबल खचुन गेले आहे. पोलीसच दारूविक्रेत्यांना सहकार्य करीत असल्याचा आरोप शंकरपुर महिला दारुबंदी समितीच्या अध्यक्षा आशाताई बाबुराव ढोक यांना लावला आहे. शंकरपुर व परिसरातिल अवैध दारु विक्रेत्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी ढोक यांनी चंद्रपुर जिंल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-03


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur