Today : 21:02:2020


राजाराम येथे वर्ग ८ ते १० पर्यंत शिक्षण सुरूकरण्यास प.स. सदस्य, भास्कर तलांडे यांचे जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिले निवेदन

प्रतिनिधी राजाराम :- मौजा राजाराम हे गाव अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असून राजाराम हे गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओढखला जातो. या गावात जिल्हा परिषद मार्फत १ ते ७ वर्ग पर्यंत शिक्षण सुरू आहे, मात्र या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी तालुक्या स्तरावर जावे लागते. या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे उद्योग धंदे नसून जास्त प्रमाणात लोक संख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. 
     तसेच विध्यार्थ्यांना पुढील शिक्षण देण्यासाठी आर्थिक स्थिती येथील गावकऱ्यांमध्ये नसल्याने अधिकतर प्रमाणात येथील विद्यार्थी अभ्यासा पासून वंचित राहतात. त्यामुळे मौजा राजाराम येथे सुरू असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे केंद्र हे वर्ग ८ ते १० मध्ये रूपांतर करून उच्च माध्यमिक ८ ते १० पर्यंत सुरू करण्यात यावा यासाठी आज राजाराम पंचायत समितीचे सदस्य भास्कर तलांडे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन दिले.
     यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी आपण लवकरच काही उपाय काढू असे म्हटले. तसेच निवेदन देताना भास्कर तलांडे पंचायत समिती सदस्य व इतर गावकरी शिष्टमंडळी उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-04


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur