Today : 20:09:2019


उपचारा अभावी युवकाचा मृत्यु, (भिसी आरोग्य केन्द्राचे दोन्ही डॉक्टर बेपत्ता, ऑक्सीजन सिलेंडर सुध्दा खाली)

पंकज मिश्रा, भिसी (चिमुर) :- भिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभिर रूग्णाला उपचारासाठी आणले असता डॉक्टर उपस्थीत नसल्यामुळे त्याला उमरेड इथे शासकिय ऋग्णालयात दाखल केले परंतु त्याचा तिथे मृत्यु झाला. भिसी येथील आकाश राजकुमार पाटील वय २४ या तरूणाला रविवार दि. ३ दिसेबरला सायंकाळी ६ वाजता भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. 
     त्यावेळी आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर हजर नव्हते. उल्लेखनिय म्हणजे, भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक पुरूष व एक महिला डॉक्टर ची नियुक्ती आहे, आणि रविवार असल्यामुळे दोन्ही डॉक्टर नागपूरला गेले होते व ऋग्णालयात फक्त एक परिचारीका उपस्थीत होती. शेवटी परिचारीकेने येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. सिध्दार्थ गेडाम यांना ऋग्णाबद्यल माहिती दिली असता, त्यांनी ऋग्णाला ऑक्सीजन लावण्याचा सल्ला दिला व फोन कट केला. ऋग्णाला ऑक्सीजन लावण्यासाठी नेले असता सिलेंडर संपल्याचे निदर्शनात आले. परत डॉ. गेडाम ला फोन केला असता त्यांनी मोबाईल बंद केला. 
     त्यामुळे एक तास उलटून सुध्दा उपचार झाला नाही, दरम्यान भिसीच्या सरपंच योगीता गोहणे, उपसरपंच, लिलाधर बन्सोड, माजी सरपंच अरविंद रेवतकर यांनी ऋग्णालयात येवून माहिती घेतली व यांनी सुध्दा डॉ. गेडाम यांच्याशी मोबाईल वर संपर्क केला असता त्यांचा फोन स्विच ऑफ असल्याचे सांगीतले. शेवटी नातेवाईकांनी त्याला उमरेडच्या ऋग्णालयात नेन्याचे ठरविले. उमरेड ऋग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी आकाश या रूग्णाला मृत घोषीत केले.
     आज सकाळी हि वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली व काही वेळातच शेकडोंच्या संख्येने नागरीक प्राथमिक आरोग्य केंद्रात गोळा झाले. यावेळी बसपा चे जिल्हा महासचीव यशवंत भोयर, उपसरपंच लिलाधर बनसोड व माजी सरपंच अरविंद रेवतकर यांच्या नेतृत्वात आरोग्य केंद्राच्या मुख्यव्दारावर ढिय्या आंदोलन सुरु केले. दरम्यान या घटनेची माहिती जिल्हा वैद्यकिय अधिकारी, जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी, तसेच तालूका वैद्यकिय अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या. "उल्लेखनिय बाब म्हणजे या सर्व घडामोळी घडत असतांना भिसीचे दोन्ही वैद्यकीय अधिकारी ११ वाजेपर्यंत आलेले नव्हते, यावेळी १०० च्या वर ऋग्ण दवाखाण्यात आपला इलाज करण्यासाठी आले होते. आठवड्याचा पहिला दिवस त्यातच काल रात्रीची घडलेली घटना, तरीही डॉक्टर वेळेवर आलेले नव्हते"
     तसेच ११ वाजता डॉ. गेडाम व महिला डॉक्टर डॉ. जैन हे दवाखाण्यात आले असता त्यांना नागरिकांनी आत प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यावेळी कॉग्रेस चे निलंबीत नेते घनशाम डूकरे यांनी नागरीकांची समजुत काढण्याचा प्रयत्न न करता उलट तुम्ही दवाखाण्याचा दरवाजा का बंद केला ? असा प्रश्न उपस्थीत केला. एकप्रकारे त्यांनी डॉक्टरची बाजू घेण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप उपस्थीतांनी लावला. काही वेळानंतर १२ वाजता तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. दिगंबर मेश्राम यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली. डॉ. मेश्राम यांना उपस्थीती नागरीकांनी घेराव टाकून डॉ. सिध्दार्थ गेडाम यांच्या निलंबनाची मागणी केली. याच दरम्यान मृतक आकाशच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह उमरेड वरुन सरळ भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला, व डॉ. गेडाम यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह हटविणार नाही अशी भुमिका घेतली. नंतर तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. मेश्राम यांनी डॉ. गेडाम वर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले व नंतर अकाशचा मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला. यानंतर उपस्थीत नागरीकांनी शेकडों सह्यांचे निवेदन  टि.एम.ओ. डॉ.मेश्राम यांना देवून डॉ.गेडाम वर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन दिले.
     "या संपुर्ण घटनाक्रमात येथील जिल्हा परिषद सदस्या तसेच स्थानीक ऋग्णकल्यान समितीच्या पदसिध्द अध्यक्षा सौ.ममता डूकरे यांनी ऋग्णालयात हजर असुनसुध्दा या घटनाक्रमावर मौण धारण केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे"
News - Chandrapur | Posted : 2017-12-04


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli