Today : 09:07:2020


नवरगाव - सिंदेवाही रस्त्याचे साईड बम दुरूस्ती करा (अंतरगाव रस्त्यावर अपघाताची शक्यता नागरिकांची रस्ता दुरूस्तीची मागणी)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- नवरगाव ते सिंदेवाही मार्ग हा राज्य मार्ग म्हणून ओळखला जातो. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, हिंगणघाट या मुख्य मार्गाला रस्ता जोडला जात असून हा अरूंद आहे व डांबरीकरण रस्त्याखालील बाजू खोलगट झाली आहे. त्यामुळे रस्ता अवागमन करतांना अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सुरळीत व्यवस्था निर्माण व्हावी याकरिता साईड बम दुरुस्ती करून रस्ता रुंदीकरण करण्यात यावी. अशी मागणी नागरिकां कडून केली जात आहे.
     सिंदेवाही - नवरगाव - चिमूर हा मुख्य रस्ता राज्यमार्ग म्हणून समजला जातो. रस्त्याच्या अवदशा आजच्या घडीला दिसून येत आहे. नवरगाव ते अंतरगाव मार्गावरील रस्त्याच्या कडेला खोलगट भाग निर्माण होवून खड्डेमय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्ता अवागमन करणाऱ्या वाहतूकदारास वाहन चालवितांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी या रस्त्यावर अपघात घडले असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. त्याचप्रमाणे लाडबोरी ते सिंदेवाही मार्गावरील रस्त्याच्या काही भागात तीच परिस्थिती असल्यामुळे नागरिकांत रस्त्याच्या अवदशेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करित रोष व्यक्त केला जात आहे. जाणीव पूर्वक लक्ष देवून साईड बमची दुरूस्ती करून रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-05


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी ८ वाजता अहेरी पोलीस मुख्यालय प्