Today : 17:02:2020


गडचांदुरातील गंजलेले लोखंडी विद्युत खांब बदला (उपलेंचीवारांची मागणी)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- कोरपना तालुक्यातील गडचांदुर या शहरातील विद्युत लाईन (तार) अनेक वर्षी जुनी झाल्याने व विविध प्रभागातील लोखंडी खांब कुजलेल्या व गंजलेल्या अवस्थेत दिसत असुन हे खांब कोणत्याही क्षणी कोसळून निष्पाप नागरिकांच्या जीवास अघोषित धोका निर्माण करेल अशी शंका निर्माण झाली आहे. विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित हे खांब बदलावे तसेच ठिकठिकाणी लोंबकळत असलेले वायर निट करावे अशी मागणी गडचांदुर भाजपा शहर अध्यक्ष सतिश उपलेंचीवार यांनी येथील महावितरणाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदना द्वारे केली आहे.
     उपलेंचीवार यांनी शहर भ्रमण करुन प्रत्येक प्रभागातील लोखंडी विद्युत खांबांची पाहणी केली असता प्रभाग क्र.२, टपाल कार्यालय जवळील रामकृष्ण वनकर, प्र.क्र.३ दिपक वर्भे, खैरे गावठान, शिवाजी चौक, भोजेकर, महादेव सातपुते, जुने पोलिस स्टेशन. प्र.क्र.४, नरेश टाॅकीज कडील पांडे व रणदिवे यांच्या घरा समोरील व इतर ठिकणी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विद्युत खांब कुंजले आणि गंजलेल्या अवस्थेत आढळून आल्या हे खांब कोणत्याही क्षणी कोसळून परिसरातील नागरिकांना जीवास धोका निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
     अनेकदा संबंधित विभागाचे याकडे लक्ष वेधण्यात आले मात्र प्रत्येकवेळी हेतुपुरस्पर दुर्लक्ष करण्यात आले. उपलेंचीवार यांनी सर्व हानीकारक विद्युत खांबांचे प्रत्यक्ष छायाचित्रच काढून संबंधित अधिकाऱ्याला दाखविले असुन यातील विद्युत खांबांना त्वरित बदलावे, रसत्याला अडथळा निर्माण करणारे पोल त्वरित बाजुला करावे, भविष्यात यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणाची राहील अशी तंबी निवेदना द्वारे देण्यात आली आहे हे विशेष.
     उपलेंचीवार यांच्यासह सतिश दांडगे, हरीश घोरे, रामसेवक मोरे, नथ्थुजी ढवस, संदीप शेरकी, नगर सेवक मोरे, कोवळे यांची उपस्थिती होती.
News - Chandrapur | Posted : 2017-12-06


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur