Today : 05:07:2020


विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय - आ. बंटी भांगडीया

संदीप गव्हारे, चंद्रपूर :- शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करून त्यांच्या पाठीशी सदैव ढाल बनून राहाणे आणि त्यांची काठी बनून शारीरिक, बौद्धिक, मानासिक, विकासाकरिता नेहमीच कार्य करीत राहाणे हेच माझे ध्येय आहे, असे भावनिक विचार आ.बंटी भांगडीया यांनी व्यक्त केले ते ब्रम्हपुरी पं.समिती अंतर्गत येणाऱ्या अऱ्हेर बिटातील पिंपळगाव (भो) येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आयोजित केलेल्या बालक्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाघाटनाप्रसंगी बोलत होते.  
     यावेळी मंचावर जिल्हा परिषद चंद्रपूर उपाध्यक्ष क्रिष्णा साहारे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर सौ.दिपाली मेश्राम, पंचायत समिती उपसभापती विलास उरकुडे, पंचायत समिती सदस्य थानेशवर कायरकर, सौ.सुनंदा ढोरे, ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण, वसंत वारजूरकर, दिपक उराडे, सरपंच सौ.भारती लांजेवार, उपसरपंच होमराज कामडी, गटविकास अधिकारी प्रदीप बिरमवार, संमेलनाध्यक्ष विस्तार अधिकारी शिक्षण अनिल चिलमवार, सचिव अनंता भोयर, अमृत नखाते, भास्कर टिकले तथा पिंपळगाव येथील प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित होते. 
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलनाध्यक्ष विस्तार अधिकारी शिक्षण, अनिल चिलमवार यांनी केले, प्रास्ताविकेतून त्यांनी शाळांना भेळसावणारी समस्या, विद्यार्थ्यांच्या अडचणी, अशा नाना तऱ्हेच्या समस्या त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मा.आमदारांच्या निदर्शनास आणून देण्याचे महत्वाचे कार्य प्रास्ताविकेतून केले यावेळी आ. बंटी भांगडीया यांनी अऱ्हेर बिटातील एकूण २७ शाळेतिल विद्यार्थ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर लवकरच प्रत्येक शाळेत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पिंपळगाव येथील क्रिडांगणाच्या विकासासाठी, जिमच्या उभारणीसाठी सात लाख रुपयांचा निधी मंजूर करून पिंपळगाववासीय तरुणांना अनोखी भेट दिली.  
     ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पाचही बिटातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता म्हणजेच माझ्या विधानसभा क्षेत्रातील असो अथवा नसो सर्वांसाठी सांस्कृतिक व्यासपीठ उभारण्याचे ठोस आश्वासन दिले त्याचबरोबर पिंपळगाव परिसरात दारूचा महापूर आला असून या दारूच्या महापुराला रोखण्यासाठी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण यांना सूचना देऊन कडक कारवाई करण्याकरिता काय उपाययोजना करता येतील. त्या उपाययोजना आपण दोघेही मिळून करू असे सांगितले आणि शेवटी शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत कितीही कवठीण परिस्थिती असली तरी मी माझ्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबिरपणे उभा असून आत्महत्येचा दुर्दैवी विचारही माझ्या शेतकरी बांधवांनी करू नये, असे कडकडीचे आवाहन आ.बंटी भांगडीया यांनी केले.  
     सदर कार्यक्रमाला २७ शाळांचे ५०० विद्यार्थी, १२७ शिक्षक - शिक्षिका परिसरातील आणि गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन पिंपळगाव (भो) शाळेतील सहा.शिक्षक तथा संमेलनाचे सचिव अनंता भोयर, सहा.शिक्षिका कु.वर्षा रिठे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संमेलनाध्यक्ष, विस्तार अधिकारी शिक्षण अनिल चिलमवार यांनी मानले. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-06


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli