Today : 11:07:2020


बाबरी मशिद प्रकरणाची पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला

विदर्भ टाइम्स न्यूज / राम मंदिरासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर ६ डिसेंबर १९९२ या दिवशी अयोध्येत मशीद पाडण्यात आली. या प्रकरणी फौजदारी खटल्यासह दिवाणी खटलाही चालला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० डिसेंबर २०१० ला मालकी प्रकरणी निर्णय दिला होता. वादग्रस्त जमिनीचे वाटप समानातीन भागांत करावे, असा निर्णय हाय कोर्टाने  दिला होता. रामलल्लाची मूर्ती असलेले ठिकाण रामलल्लासाठी द्यावे. तसेच सीता रसोई व राम चबुतरा निर्मोही आखाड्याला देण्यात यावेत आणि उर्वरित एक तृतीयांश जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला दिली जावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. 
     त्यानंतर या प्रकरणी रामलल्ला विराजमान आणि हिंदू महासभेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली तर दुसरीकडे सुन्नी वक्फ बोर्डाने देखील उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ ला याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती दिली. यात सर्वोच्च न्यायालयाने 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले. तेव्हापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 
     आज सुमारे दोन तास चाललेल्या दाव्या-प्रत‌दिव्यांनंतर सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकी नंतर घेण्याची सुन्नी वफ्फ बोर्डाचे वकील कप‌िल स‌िबल यांची मागणी फेटाळली. या प्रकरणीची पुढील सुनावणी ही ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. वक्फ बोर्डाने केलेली मागणी धक्कादायक आण‌ि आश्चर्यकारक असल्याची टिप्पणी यावेळी सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या खंडपीठाने नोंदवली. आज अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्याच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत.




News - Editorial | Posted : 2017-12-06


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli