Today : 13:11:2019


सूत्रसंचालन नवी ओळख निर्माण करते - चाफेश्वर गांगवे

रिसोड, महेंद्रकुमार महाजन जैन :- श्री बाबासाहेब धाबेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, रिसोड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे सत्र दिनांक १ डिसेंबर ते दिनांक ८ डिसेंबर २०१७ या कालावधीत रिसोड तालुक्यातील दत्त कग्राम भोकरखेड येथे सुरू असून दिनांक ५ डिसेंबरच्या महाराष्ट्रातील कवींच्या कविता आणि सूत्रसंचालन या विषयावर चाफेश्वर गांगवे बोलत होते.
     मानवी समुहात वावरत असताना आपण समाजाचं देणं लागतो या उदात्त हेतूने प्रत्येक लिखाण करणारा व्यक्ती लिहीत असतो, लिखाणाला समर्पणाची किनार असते, सर्वात मोठी जबाबदारी लिखाण करणाऱ्यांच्या खांद्यावर असते आणि तेवढं भान सुद्धा लिखाण करणाऱ्यांना पाळाव लागत, आणि या सर्वांसाठी लिखाणाचा संयम महत्वाचा असल्याची जाणीव यावेळी बोलताना चाफेश्वर गांगवे यांनी करून दिली.
     सूत्रसंचालन हे क्षेत्र अतिशय व्यापक असून  वाचनाच्या कक्षा यासाठी सूत्रसंचालकाला सतर्क ठेवाव्या लागतात आणि सुत्रसंचालनामुळे आपल्याला नवी ओळख मिळते असेही यावेळी चाफेश्वर गांगवे यांनी बोलताना विषद केले.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.अजाबराव वानखडे, प्रमुख अतिथी म्हणून विर जिवाजी पथकाचे काशीनाथ कोकाटे, कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रमोदकुमार नंदेश्वर, प्रा.जयंत मेश्राम यांची यावेळी उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो प्रतिनिधी वैदेही केदारे, प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रमोदकुमार नंदेश्वर तर आभारप्रदर्शन शामल अंभोरे यांनी केले.
News - Washim | Posted : 2017-12-06


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीब