Today : 21:11:2019


हेल्पिंग हॅण्ड्स तर्फे गरजुंना स्वेटर व जरकिन वाटप

दीपक सुनतकर, अहेरी :- अहेरी येथील कायम विनाअनुदानीत संत मानवदयाल शाळेत अहेरी उपविभागातील दुर्गम भागातील गोर गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. अनेक विद्यार्थी फ़क्त एका ड्रेस वर अहेरीत येऊन कसे बसे शिक्षण घेत आहे. मात्र या गोर गरीब जवळपास २५ ते ३० गरजू विद्यार्थ्यांकडे साधे स्वेटर सुद्धा नसल्याची माहिती प्रणय येगोलपवार यांनी आज सकाळी दिली. 
     आपण गरम कपड्यात राहून हे गोर गरीब विद्यार्थी ठंडित कूडकुडनार ही गोष्ट मनाला पटण्यासारखी नव्हती. यावर लगेच हेल्पिंग हॅण्ड्स टिम कामाला लागली व यावर काही तासांतच ३० विद्यार्थ्यांसाठी स्वेटर आणि जरकिन खरेदी केले व आजच त्याचे छोटेखानी कार्यक्रमात वितरण केले. स्वेटर आणि जरकिनसाठी अहेरीचे ऍड.सतीश जैनवार साहेब, मनोजभाऊ मेडपल्लीवार, राजेशदादा मुप्पावार, संजयभाऊ चिमड्यालवार, महावीरभाऊ जयस्वाल यांनी आर्थिक मदत केली. 
     या छोटेखानी कार्यक्रमात हेल्पिंग हॅण्ड्स टिम चे प्रतिक मुधोळकर, शंकरअण्णा मगडीवार, पप्पूदादा मद्दीवार, शैलेशभाऊ पटवर्धन, नितिनदादा दोंतुलवार, डॉ.प्रसन्नभाऊ मद्दीवार, पूर्वाताई दोंतुलवार, स्नेहलताई जयस्वाल, संजयभाऊ चिमड्यालवार, ईस्ताक शेख, मुख्यध्यापक प्रकाश मारपाकवार सर, संदिप गुम्मलवार, अनुराग बेझलवार आदि उपस्थित होते. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर