Today : 11:07:2020


आ.मितेश भांगडीया यांच्या वाढदिवसानिमीत्य भुमिपुजन सोहोळ्याचे मुख्याधिकारी ने लावला चुकीचा प्रोटोकाल (काँग्रेसचे गटनेत्याची जिल्हाधीकारी कडे तक्रार)

पंकज मिश्रा, भिसी (चिमुर) :- विधान परिषदेचे आमदार मितेश भांगडिया यांचा वाढदिवस ८ डिसेंबर शुक्रवारला आहे. या वाढदिवसानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन चिमूर नगर परिषद क्षेत्रात नगर परिषद इमारत, सांस्कृतीक सभागृह, शासकिय वस्तीगृह इमारत बांधकामाचे भुमिपुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम  पत्रिकेत मुख्याधिकारी यांनी नगरसेवक पदाधिकारी यांचा चुकीचा प्रोटोकॉल लावल्याने माना-अपमान झाल्यावरून नगर परिषद कॉंग्रेस गट नेते कदीर शेख यांनी मुख्याधिकारी यांची तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
     चिमुर शहरात अनेक दिवसापासून स्थानिक राजकिय पुढारी, खासदार, आमदार यांचे वाढदिवस होत असतात, त्यामुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधुन भुमिपुजन किंवा उद्घाटन सोहळे आयोजीत करण्याची प्रथाच पडलेली आहे. चिमूरचे भुमिपुत्र व विधान परिषदेचे सदस्य मितेश भांगडिया यांच्या ८ डिसेंबर रोजी असलेल्या वाढदिवसा निमीत्त चिमूर नगर परिषदेच्या इमारत, शहिद बालाजी रायपुरकर सांस्कृतीक सभागृह व मागासवर्गीय मुलींचे शासकिय वस्तीगृह या इमारतीचे भुमिपुजन सोहळा आयोजीत करण्यात आले असुन, याकरीता पक्षाचे नेते कार्यकर्ते पाहुणे आहेत. या कार्यक्रमाकरीता छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत सहाय्याक आयुक्त समाज कल्याण विभाग, चंद्रपुर व मुख्याधिकारी नगर परिषद चिमूर यांची नावे विनीत म्हणुन आहेत.  
     निमंत्रण पत्रिकेत नगर परिषद सभापती, गटनेता आणि नगर सेवक यांची नावे भाजपा नेते आणि कार्यकर्ते यांच्या नावाच्या नंतर नामोल्लेख केल्याने हा जानुन बुजुन हेतुपुरस्कर मुख्याधिकारी यांनी चुकीचे प्रोट्रोकाल लावल्याने काँग्रेस नगर सेवकांनी मान-अपमानाच्या या प्रकरणाचा निशेध केला असुन, प्रोट्रोकाल पाडत नसलेल्या मुख्याधिकारी यांचे वर तात्काळ कार्यवाही करण्याची तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे काँग्रेस नगरसेवक गटनेता अ.कदीर शेख यांनी केली आहे. त्यामुळे या मान-अपमान नाटयावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
     "साह्यक आयुक्त व मुख्याधिकारी यांना पडला प्रोटोकालचा विसर" सामाजिक न्यायविभाग व नगर परिषद चिमुर अंतर्गत मंजुर इमारती बांधकाम भुमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रम निमंत्रण पत्रिका छापन्यात आल्याया पत्रिका मध्ये उपनगराध्यक्ष सभापती व नगरसेवक यांचे नांव क्रम प्रोटोकाल नुसार राजकिय पक्षाच्या पदाधिकांऱ्यांच्या प्रथम असायला पाहिजे मात्र राजकिय पदाधिकाऱ्यांच्या नावानंतर निमंत्रण पत्रिकेत नाव छापन्यात आली. या प्रकारामुळे साहयक आयुक्त सामाजीक न्यायविभाग व नगर परिषद मुख्याधिकारी यांना विसर पडला आहे, तरी यांचेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी कॉग्रेसचे स्विकृत नगर विनोद ढाकुनकर यांनी केली आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli