Today : 06:07:2020


स्टेट बैंक ग्राहक सेवा केंद्रांचे भविष्य अधांतरी

किशोर कराडे, कुरखेडा :- केंद्राच्या वित्तीय मंत्रालयातर्फे राष्ट्रीयकृत बैंकाँचे रोज व्यवहारातील कामे सोपी व्हावी व त्यांना विणा अडचणी कामे कमी कालावधीत पूर्ण होण्यासाठी वित्तीय समावेशन कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांमार्फ़त ग्राहक सेवा केंद्राची सुरुवात करण्यात आली. यात अग्रेसर असणाऱ्या स्टेट बैंक ऑफ इंडिया या बँकांचे बी.सी. मार्फ़त कमिशनच्या आधारावर ग्राहक सेवा केंद्रांची निर्मिती करून बेरोजगार युवकांना रोजगाराचे साधन देण्याचे लालच देण्यात आले. 
     राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही शेकडो बेरोजगार युवकांनी ग्राहक सेवा केंद्राची स्थापना करून आपले काम सुरु केले. मात्र दिवसंदिवस ग्राहक सेवा केंद्र संचालकांच्या समस्या सूटता सुटेनास्या झाल्या. कमीशन कमी झालेत, अकॉउंट ओपनिंग होत नाहीत, ट्रांसेक्शन टाइम आउट होत आहेत, के वाय सी होत नाहीत, आधार लिंक करण्यासाठी समस्या निर्माण होत आहेत, ब्रांच चे मैनेजर सहकार्य करीत नाही, बी सी सहकार्य करीत नाही. असे असून सुद्धा सदर केंद्र चालक आपले काम ईमानदारीने करूनही ग्राहक त्यांच्यावर अविश्वास दाखवित असल्याचे प्रकार घडत असल्याने जाब विचारावा कुणाला असा यक्ष प्रश्न मात्र या निमित्याने तयार झाला असून यामुड़े मात्र ग्राहक सेवा केंद्र संचालक समस्येच्या विडख्यात सापडला आहे. 
     एकिकडे बैंक आमचे सर्व कामे करा अन्यथा तुमचे कोड बंद करू अश्या धमकीया देत आहेत तर दुसरीकडे बी सी कमीशन कमी देत आहे. दोघांच्या लफदयात केंद्र चालक फसले असून यावर त्वरित निर्वाडा काढण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्ह्यातील केंद्र चालकांनी दिला आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-08


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli