Today : 17:11:2019


बहुजन समाज पार्टीच्या बहन मायावती याचा विदर्भ दौरा १० डिसेंबरला - जास्तीत जास्त बहुजनांनी उपस्थिती दर्शवावी जिल्हा प्रभारी रमेश मडावी यांचे आव्हान

दिपक सुनतकर, अहेरी :-  बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुमारी बहन मायावती याचा विदर्भ दौरा निश्चित झाल्याने कस्तूरचंद नागपूर येथे १० डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता विशाल कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन केलेले आहे. भाजप व त्याचे सहकारी पक्ष केंद्र शासन व महाराष्ट्र शासन आणि अन्य विरोधी पक्षाची द्वारा खासकरून दलित, आदिवासी, ओबीसी, भटक्या जमाती, विशेष मागास वर्ग, मुस्लिम तथा अन्य धार्मिक अल्पसंख्यांक  व गरीब मजदूर किसान, महिला, युवावर्ग आणि मध्य वर्गीय इत्यादी विरोधी जातीवादी, सामुदायिक व पुंजीवादी, भांडवलदार निती तथा यांचा कार्याचे पर्दाफाश करण्यासाठी व बहुजन समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी बहन मायावती यांचे योग्य मार्गदर्शन लाभणार आहे. 
     तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली व मुलचेरा या पाचही तालुक्यातील आणि अहेरी उपविभागातील सर्व दलित, आदिवासी, ओबीसी, भटक्या जमाती, विशेष मागास वर्ग, मुस्लिम लोकांनी बहन मायावती यांचे मार्गदर्शनाचे लाभ घेण्यासाठी या विधानसभा क्षेत्रातील १० हजार कार्यकर्ते या कार्यकर्ता संमेलनात सहभागी होण्याची माहिती गडचिरोली जिल्हा प्रभारी रमेश मडावी यांनी विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज दिनांक ०८ डिसेंबर २०१७ सांगण्यात आली. 
     यावेळी उपस्थित बहुजन समाज पार्टी चे कांताबाई कांबळे (महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष), शंकर बोरकुटे, (जिल्हा महा सचिव), शंकर दुर्गे, (जिल्हा कोषाध्यक्ष), कुशल डोंगर, (अहेरी विधानसभा अध्यक्ष), नारायण अलोणे, मनोज शेंडे, महादेव झाडे, नरेद्र सडमेक आदी उपस्थित होते. मागील १५ दिवसापासून अहेरी उपविभागात विविध ठिकाणी जनजागृती करून याचे महा कार्यकर्ते संमेलनात उपस्थित होण्याचे संदेश देत होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-08


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli