Today : 10:07:2020


रिसोड येथे औषध विक्रेता प्रशिक्षण शिबिर संपन्न

महेंद्रकुमार महाजन जैन, रिसोड :- अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र व वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर ला रिसोड तालुक्यातील किरकोळ व घाऊक परवानाधारक औषधी विक्रेत्याकरिता कायदेशीर बाबींचे प्रशिक्षण शिबीर महिला उत्कर्ष प्रतिष्ठान फार्मसी कॉलेज देगाव येथे संपन्न झाला. या शिबिरात अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त डॉ प्रशांत आस्वार यांनी ड्रग अँड कॉस्मेटिक अक्ट १९४०, डी.पि.सी.ओ. २०१३ तशेच एन.पि.पि.ए. तील तरतुदी एन. डी.पि.एस. अक्ट १९८५, फूड सेफ्टी स्टॅंडर्ड अक्ट २००६, या विषयावर मार्गदर्शन केले.
     यावेळी नंदकिशोर झंवर यांची एम.एस.सी.डी.ए. अमरावती झोनच्या सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला व डॉ.प्रशांत आस्वार व प्रा. युवराज पांढरे याना समूर्तीचिन्ह देऊन राजेश पाटील व हरीश लाहोटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिअशन चे जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील शिरसाट, हरीश लाहोटी, नंदकिशोर झंवर प्रा.युवराज पांढरे अकोला जिल्हा सचिव अ.वकार भाई अमोल पाटील सरकटे, हरिभाऊ पाटील खोडके, अनंता देशमुख यांची होती. रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील २१५ औषधी विक्रेते उपस्थित होते. 
     तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अमित सोनटक्के यांनी केले तर संचलन वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट सचिव नंदकिशोर झंवर यांनी केले. असून आभार प्रदर्शन हरिभाऊ खोडके यांनी केले. कार्यक्रमाची सांगता कॉलेज ऑफ फार्म अल्पोहर देऊन करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनंत देशमुख ज्ञानेश्वर वाळके, महेश मालपाणी अमोल सरकटे, मधू व्यास, चंद्रकांत शर्मा, अभिषेक चरखा, संतोष खोडके, संतोष शेटे रुपेश बाजड व इतरांनी परिश्रम घेतले. 
News - Washim | Posted : 2017-12-08


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :- 
भद्राव