Today : 04:07:2020


११ डिसेंबरला विदर्भ बंद, आंदोलनात सहभागी व्हा :- विदर्भ आंदोलन समिती

किशोर कराडे, कुरखेडा :- सत्तारूढ राज्य व केंद्र शासनाने निवडणूक पूर्वी विदर्भ राज्य व शेतकरी हिताचे विविध आश्वासने दिले होते. मात्र सत्ता मोळूनही तीन वर्षांचा कार्यकाळ झाला असून आश्वासने पूर्ण करण्यात आली नाही. शासनाला त्यांच्या वचननाम्याचे स्मरण करुन देण्याकरिता ११ डिसेंबर रोजी विदर्भ बंदची हाक देण्यात आलेली आहे. नागरिकांनी या विदर्भ बंद आंदोलनात सहभागी होत आपली प्रतिष्ठाने व कामे बंद ठेवून विदर्भ बंदच्या आंदोलनात सहभागी व्हा असे आव्हान विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
     वेगळा विदर्भ राज्याची मागणी फार जुनी आहे,  मात्र वेळोवेळी सत्तेत येणाऱ्या सत्ताधारी पक्षांनी या मागणीला हेतू परस्पर दुर्लक्ष केले आहे. संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाचा विकास खुंटलेला आहे. स्वातंत्र विदर्भ राज्य आल्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोग ऐवजी विदर्भ लोकसेवा आयोगाचे निर्माण होऊन येथील तरुणांना १०० टक्के नोकऱ्यांचे उपलब्ध होतील. विदर्भ वीज उत्पादनात परिपूर्ण असतांनाही येथील नागरिक व शेतकरी वीज खंडितेच सामना करावा लागतो वेगळा विदर्भ झाल्यास ही समस्या राहणार नाही व स्वस्त दरात वीज उपलब्ध होईल. आर्थिक दृष्ट्या सुद्धा विदर्भ सक्षम होत निधी व वनकायद्यामुळे रखडलेल्या अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लागत येथे हरित क्रांती घडवून येईल. अश्या आशावाद व्यक्त करत सत्ताधाऱ्यांना त्यांच्या वचननामा आठवण करून देण्याकरिता ११ डिसेंम्बर सोमवारला विदर्भ बंद मध्ये सहभागी होत व्यापार, उद्योग, प्रतिष्टान, शाळा, कॉलेज बंद ठेवावे व तसेच ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करीत शासनाला जाब विचारावा असे आव्हान पत्रकार परिषदेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्रसिह ठाकूर, उपाध्यक्ष घिसू खुने, तालुका संघटक गणपत सोनकुसरे, रमेश मानकर, डॉ.परशुराम खुने यांनी केली आहे. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli