Today : 23:02:2020


पुढच्या वाढदिवसापर्यत शंकरपुरला रुग्णालय व नगर पंचायतसाठी प्रयत्न करणार :- आ.किर्तीकुमार भांगडीया

"आमदार मितेशजी भांगडीया सत्कार कार्यक्रम"
चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- मी आमदार असलो तरी प्रथम जनतेचा सेवक असून यापूर्वी अनेक आमदार होऊन गेले परंतु त्यांनी पाहिजे तेवढा विकास केला नसून निव्वळ उहापोह केला.  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ओरड विरोधी पक्ष करीत असले तरी येत्या ३१ डिसेंबर पर्यत पूर्णपणे कर्जमाफी होणार असून २२ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असून उर्वरित कर्जमाफ हे ३१ डिसेंबरपर्यत होणार आहे. कर्जमाफी हि पारदर्शी धोरणानुसार होत आहे. भाजपचे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शंकरपूरला रुग्णालय व नगर पंचायतची मागणी पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी म्हणजे पुढचा वाढदिवसापर्यंत आपण करणार असल्याचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी सांगितले. शंकरपूर येथे आमदार मितेशजी भांगडीया यांच्या सत्कार व क्रांतीनायक या महानाट्याचे कार्यक्रमात आमदार किर्तीकुमार भांगडीया बोलत होते.
     यावेळी विधान परिषद सदस्य आमदार मितेशजी भांगडीया, जि.प. अध्यक्ष हरिशजी शर्मा, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, भाजप जिल्हा अध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष डॉ. श्यामजी हटवादे, तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, जेष्ठ नेते निलम राचलवार, नगराध्यक्ष शिल्पा राचलवार चिमूर न.प. उपाध्यक्ष तुषार शिंदे, नगराध्यक्ष उमाजी हिरे नागभिड, वसंत वारजूकर,  डॉ. दिपक यावले, ज्योती ठाकरे, गटनेत्या छाया कंचर्लावार, हितेश सूचक, नगरसेवक तुषार काळे, जयश्री निवटे, सतीश जाधव, बकारामजी मालोदे, सुनील किटे, एकनाथ थुटे, चौखे बाबू, डहाके गुरुजी, पुरुषोत्तम काटवलकर आदी उपस्थित होते. 
     राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व विकास विद्यालयाच्या विध्यार्थीनींच्या स्वागत गीताने सुरुवात झाली. दरम्यान आमदार मितेशजी भांगडीया यांच्या उपस्थित केक कापून फटाक्याच्या आतिष बाजीत वाढदिवस साजरा करून सत्कार करण्यात आला.
     सत्कारमूर्ती आमदार मितेश भांगडीया म्हणाले कि, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे कृपेने किर्तीकुमार आमदार झाला असून विविध विकास कामे खेचून आणून काम करीत असतांना एखादे काम मागे राहिल्यास नाराज होण्याचे काम नाही विरोधक निव्वळ खोटया वल्गना करीत असून विरोधकांनी सार्वजनिक मंचावर आपल्या चुका जाहीर कराव्या राष्ट्रसंत तुकडोंजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांचे विचारांची गरज असल्याचे सांगत त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. 
     प्रास्ताविक प्रा.विजय टिपले मधून शंकरपूरला ग्रामीण रुग्णालय, शंकरपूरला नगर पंचायतची मागणी केली. संचालन वसंत चौधरी यांनी केले आभार अवि बारोकर यांनी केले क्रांतीनायक महा नाटयाचे कार्यक्रमासाठी अविनाश बारोकर, अनिल शेंडे, मनोहर रंदये, गजानन कामडी, प्रफुल खोब्रागडे, प्रफुल कोलते, सावन गाडगे, प्रफुल डांगे, आशिष टिपले, कँनु बघेल, आदित्य खोब्रागडे, बशीर शेख, नाना ढोक, अरविंद राऊत, नारायण चौधरी गोकुल सावरकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.  
     क्रांतीनायक या महानाट्य कार्यक्रमासाठी हजारो महिला पुरुष उपस्थित होते. सोशल मिडिया चिमूर विधान सभा प्रमुख अरविंद राऊत व त्याच्या चमूने जनजागरण सोशल मिडियाद्वारे केली होती.
News - Chandrapur | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

दोन वर्षात या ठिकानचा चेहरा - मोहरा बदललेला दिसेल : आ.अॅड.धोटेंची ग्वा