Today : 10:07:2020


जनसेवेचा माध्यमातून निरंतर सेवा कायम राहील :- आ.किर्तीकुमार भांगडीया

आमदार मितेशजी भांगडीया यांच्या वाढदिवसानिमीत्त (चिमूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृहाचे भूमिपूजन संपन्न, चिमूर येथील नगर परिषद प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन संपन्न, विधवा, अपंग व्यक्तींना व गुरुदेव मंडळांना विविध वस्तूचे वाटप)
चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :-  चिमूर क्षेत्रात जनतेच्या अडी अडचणी सोडविण्याचे काम भाजप चे माध्यमातून होत असताना, राजकारण सोबत सामाजिक उपक्रम होत असून प्रत्येक महिन्यात किंवा आठवड्यात भेटत असताना अडचणी सांगण्याचे सांगत आमदार किर्तीकुमार भांगडीया म्हणाले कि, ग्रामीन भागातील विद्यार्थ्यासाठी सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाचे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृहाचे भूमिपूजन करून त्यांची निवासस्थानसाठी व्यवस्था होणार असल्याचे सांगितले. 
     तसेच नगर परिषद चे बांधकाम करणे व शहिद बालाजी रायपूरकर सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणेच्या भूमिपुजन कार्यक्रमात आमदार किर्तीकुमार भांगडीया बोलत होते. यावेळी वसंत वारजूकर, भाजप जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ श्यामजी हटवादे, नगराध्यक्ष शिल्पा राचलवार, उपाध्यक्ष तुषार शिंदे, गटनेत्या छाया कंचर्लावार, बांधकाम सभापती नितीन कटारे, नगरसेवक तुषार काळे, भारती गोडे, उषा हिवरकर, सतीश जाधव, जयश्री निवटे, पुंडलीक मत्ते, मनोज मामीडवार, निलम राचलवार, विनोद चोखरे, विनोद अढाल, भाजप तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर, प्रकाश वाकडे, आदी उपस्थित होते. 
     यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा म्हणाले कि, हा राजकीय मंच नसला तरी भाजपची संस्कृती सेवा असून आमदार किर्तीकुमार भांगडीया यांची निरंतर सेवा देत असून विदर्भातील निवडक आमदारापैकी आ.भांगडीया एक सर्वस्व आहेत. गरिबांची सेवा करण्यास ते प्रथम प्राधान्य देत असतात. भांगडीया परिवारावर निरंतर आशिर्वाद जनतेनी ठेवावे जेणेकरून आणखी सेवाभावी कार्य त्याचे कडून होत राहील. नगरपरिषदेना वैशिष्ठपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ठोक तरतूद या योजने अंतर्गत असलेल्या शहीद बालाजी रायपूकर सांस्कृतिक सभागृह कामाची किंमत ४३५.८७ लक्ष रुपये निधी मंजूर झाली आहे.
     आमदार मितेशजी भांगडीया यांचे वाढदिवस कार्यक्रम निमित्य गरजू अपंग लाभार्थ्याना तीन चाकी सायकल वाटप, विधवा महिलांना शिलाई मशीन तसेच भजन मंडळांना तबला पेटी व साउंड सर्व्हिस वाटप आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे हस्ते वितरित करण्यात आले.
     तसेच प्रास्ताविक डॉ. दिलीप शिवरकर यांनी प्रस्ताविक भाषणातून सांगितले कि, आमदार किर्तीकुमार भांगडीया यांची आरोग्यसेवेला विशेष महत्व देऊन अविरत सेवा सुरु असून नागरिक आपल्या अडचणी सोडवीत असतात त्यामुळे जनतेनी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे पाठीशी राहण्याचे सांगितले. संचालन जयंत गौरकार तर आभार शरद गिरडे यांनी व्यक्त केले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नांदगाव (मुल) येथील ग्रामसेवक निलंबीत (शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टू

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
मुल, प्रतिनिधी :-
मुल तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामसेवकावर करवाईसाठी