Today : 13:11:2019


चाणक्य मतिमंद विद्यालय आलापल्ली स्थित आष्टी इथे जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची आकस्मिक भेट (दरम्यान शाळा प्रमुखासह शिक्षक होते गैरहजर)

विदर्भ टाइम्स न्यूज / प्रभू विश्वकर्मा बहूउद्देशीय ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा व्दारा संचालीत चाणक्य मतिमंद विद्यालय, आलापल्ली स्थित आष्टी ही शाळा शासनाची कोणतीही परवानगी न घेता संस्था चालक व शाळा प्रमुखांनी परस्पर पन्नास कि.मी. लांब अंतरावर आष्टी येथे स्थानांतरीत केल्याबाबतचे वृत वर्तमानपत्रा मधून प्रकाशीत झाल्यानंतर अपंग आयुक्तालय पूणे पासून तर जिल्हा समाज कल्याण अधिकारी गडचिरोली यांची एकच तारांबळ उडाली. 
     याबाबतची रितसर तक्रार समाज कल्यान सभापती व जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचेकडे केली होती. त्याची दखल घेत काल दि ८ डिसेम्बर रोजी उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी स्वत: आष्टी येथिल चाणक्य मतिमंद शाळेला भेट देवून पाहणी केली असता. शाळा प्रमुख राजू सुरसे सह कर्मचारी उपस्थित नव्हते त्यांच्या मागील दोन दिवसांपासून हजेरी रजिस्टरवर स्वाक्षऱ्या तपासणी केली असता स्वाक्षरी नव्हती. आलापल्ली येथे रितसर सुरु असलेली मतिमंद शाळा आष्टीला का स्थानांतरीत केली याबाबत विचारना केली असता  कोणत्याही कर्मचाऱ्याने काहीही सांगीतले नाही.
     आष्टीत सुरु असलेल्या शाळेत अनेक समश्या आहेत. हि इमारत शाळा भरण्याकरीता योग्य नसल्याची माहिती उपाध्यक्ष अजय कंकडालवार  यांनी दिली. शाळा निवासी असल्याने शाळेत विद्यार्थ्यां करीता सुविधा नाहीत. तीस विद्यार्थी व सतरा कर्मचारी यांना केवळ पाच खोल्या आहेत. त्यात तीन वर्ग खोल्या, एक शाळा प्रमुखाचे कार्यालय, एक स्वंयपाक खोली मग विद्यार्थीची निवासाची व्यवस्था कशी असा प्रश्ण उपाध्यक्षांनी उपस्थितीत केला. ही शाळा गडचिरोली रोड लगत केवळ शंभर फुट अंतरावर आहे. या शाळेला संरक्षक भींत नाही, अगोदरच मतिमंद मुले यांचे कमीजास्त झाल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्ण उपाध्यक्ष कंकडालवार यांनी उपस्थित केला.
     शाळा चालविण्याची आलापल्लीची परवानगी असताना शाळा इतरत्र नेण्याची गरजच का ? यासाठी शासनाची मंजूरी घेतली नाही व समश्याग्रस्त इमारतीमध्ये शाळा भरविली जात आहे. याबाबत उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याकार्य अधिकारी शांतनू गोयल व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांचेकडे विचारना केली असता प्रशासनाला समंधीत संस्थेने कोणतीही सुचना दिली नसल्याची माहिती त्यानी दिली. 
     तसेच समंधीत शिक्षण संस्थेने सदर शाळा आलापल्लीला तात्काळ पूर्वरत सुरु करावी अशी मागणी उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली जोपर्यंत शाळा आलापल्लीला पुर्वरत सुरु होणार नाही तोपर्यंत या शाळेतील वेतन काढू नये अशा सुचना जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना दिल्याची माहिती उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली.
कोट - १  "चाणक्य मतिमंद विद्यालय आलापल्लीला पूर्वरत सुरु करण्यासाठी प्रशासनाला सुचना केल्या आहेत. अहेरी उपविभागात हे एकमेव मतिमंद विद्यालय आहे. या विभागातील विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहू नये म्हणून संस्थेनी तात्काळ शाळा  आलापल्लीत सुरु करावी. अन्यथा प्रशासनांनी रितसर कारवाई करुन या शाळेची मान्यता रद्द करावी :- अजय कंकडालवार, उपाध्यक्ष जि.प.गडचिरोली.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

दोन वर्षात या ठिकानचा चेहरा - मोहरा बदललेला दिसेल : आ.अॅड.धोटेंची ग्वाही (अमलन

2018-01-08 | News | Chandrapur