Today : 05:07:2020


आमचे सरकार हे शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणारे सरकार – आ. बंटीभाऊ भांगडिया

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वातील सरकार हे शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणारे सरकार असून मावा तुडतुडा रोगामुळे संकटात असलेल्या धान उत्पादक आणि कपाशीच्या शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत सरकार करेल अशी ग्वाही चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय बंटीभाऊ भांगडिया यांनी दिली. चिमूर विधानसभा क्षेत्रातील शंकरपूर येथे माननीय आमदार मितेशजी भांगडिया यांच्या जन्मदिनाचे औचित्त साधून आयोजित करण्यात आलेल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित  “क्रांतीनायक” या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
     तसेच ते म्हणाले कि, कॉंग्रेसच्या काळात संपूर्ण देशासाठी केवळ ५२००० कोटीची आणि तेही कॉंग्रेसचे नेते अध्यक्ष, संचालक असलेल्या सहकारी बँकाचे खिशात जाणारी बनवाबनवीची कर्जमाफी झाली होती परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एकटया महाराष्ट्रासाठी एतिहासिक अशी ३४००० कोटींची प्रत्यक्षात खऱ्या शेतकऱ्यांच्या फायद्याची कर्जमाफी केली. बोगस शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊ नये म्हणून आनलाइन पद्धतीने हे कार्य करण्यात येत आहे, त्यामुळे  शेतकऱ्यांना थोडी अडचण होत आहे. 
     त्यामुळे ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत संपूर्ण ६९ लक्ष शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. या नाटकाच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंताचे व वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांचे विचार जनसामान्यांच्या  मनामनात रुजविण्यासाठी या नाटकाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करावा. शंकरपूर क्षेत्रातील विकासाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. राष्ट्रसंताच्या आशीर्वादानेच व आपल्या सर्वांच्या सहकार्याने चिमूर क्षेत्राचा विकास करण्यात यश आले आहे.
     यावेळी सत्काराला उत्तर देतांना माननीय मितेशजी भांगडिया म्हणाले कि, भांगडिया परिवाराकडे सामाजसेवेचे बाळकडू पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. गेल्या तीस वर्षापासून ते समाजकारणात असून चिमूर विधानसभा क्षेत्राचा विकास भांगडिया परिवार कडूनच व्हावा हि नियतीची इच्छा आहे. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहे. राजकारणात सगळ्यांना समाधानी करता येत नाही. स्थानिक आमदाराला संपूर्ण क्षेत्राकडे सारखे लक्ष द्यावे लागते. परंतु मागील अनेक लोकप्रतिनिधीच्या तुलनेत आ. किर्तीकुमार यांचे काम कितीतरी पटीने सरस आहे असे मला वाटते. आपले प्रेम सदैव असावे हिच अपेक्षा.  यावेळी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जीवनात प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
     यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष देवरावजी भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णाजी सहारे, भाजपा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष हरीशजी शर्मा, भाजपा जेष्ट नेते वसंतभाऊ वारजूकर, डॉ. दीपकजी  यावले, बकारामजी मालोदे, प्रा.विजय टिपले, चिमूर नगर परिषद अध्यक्ष शिल्पाताई राचलवार, सिंदेवाही नगर परिषदेचे उपाध्यक्ष हितेशजी सूचक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्याम हटवादे, भाजपा चिमूर तालुका अध्यक्ष डॉ. दिलीपजी शिवरकर, भाजपा चिमूर व्यापारी आघाडीचे सचिव नीलम राचलवार, बंडूभाऊ जावळेकर, चिमूर नप नगरसेवक छायाताई करचर्लावार, जयश्री निवटे, नन्नावारेताई, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष संदीप पिसे, चिमूर तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष किशोर मुंगले, चिमूर विधानसभा  संघटक सुनील किटे, भाजपा चिमूर तालुका महामंत्री विनोद अढाल, भाजपा ओबीसी आघाडी अध्यक्ष एकनाथ थुटे, आदि यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
     जिल्हा परिषद प्रमुख अविनाश बारोकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल कोलते, तालुका उपाध्यक्ष अनिल शेंडे, मनोहरजी रंदये, नारायण चौधरी, प्रफुल्ल खोब्रागडे, प्रफुल्ल डांगे, कन्नू बघेल, सावन गाडगे, गजानन कामडी, गोकुल सावरकर, विलास मेहरकुरे आदींसह भाजपा शंकरपूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी  नाटकाच्या आणि कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता परिश्रम घेतले.  
News - Chandrapur | Posted : 2017-12-09


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
गिरगाव पांदन रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन

2018-01-08 | News | Chandrapur