Today : 21:09:2019


वैज्ञानिक दृष्टिकोन हेच अंधश्रद्धा दूर करू शकते त्यामुळे विज्ञानाची कास धरावी - प्रा. हरिभाऊ पाथोडे

प्रतिनिधी, सावली :-  चांदली (बुज) येथे व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा व स्वच्छ: गांव या विषयावर जनजागृती कार्यक्रम  घेण्यात आला. यावेळी अंधश्रद्धा, बुवाबाजी यावर परखड मत व्यक्त करीत विज्ञानाची कास धरावी असे मत प्रा. हरिभाऊ पाथोडे यांनी व्यक्त केले. तसेच तालुक्यातील चांदली (बुज) या गावात लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा, गावातील अवैध दारू, अस्वछता यावर जनजागृती करण्यासाठी पं.स.विजय कोरेवार यांचे कल्पनेतून "व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा व स्वच्छ: गांव" या विषयावर ग्रामपंचायत व तंटामुक्ती यांचे वतीने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. 
     यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संयोजक प्रा. हरिभाऊ पाथोडे यांनी  प्रात्यक्षिकाचे माध्यमातून बुवाबाजीवर प्रहार केला. पंचायत समिती सदस्य विजय कोरेवार यांनी दारूचे दुष्परिणामावर  मार्गदर्शन करीत दारूबंदीसाठी युवकांनी, महिलांनी समोर येण्याचे आवाहन केले. डॉ तुषार मर्लावार यांनीही अंधश्रद्धाबाबत गैरसमजुतीवर मार्गदर्शन केले. साहाय्यक गटविकास अधिकारी वाळके यांनी सौचालयाचे महत्व सांगितले.
     कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच जिजाताई गदेकार होते तर मंचावर उपसरपंच बंडू कोडापे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास येनगंटीवार, माजी उपसभापती मंगला चिमड्यालवार, गजानन सा. चिमड्यालवार, पो.पा. चिंतामण बालमवार, मधुकर येनगंटीवार गुरुजी, विवेक मुत्यालवार, अनिल अमृतवार, विस्तारी कोरेवार, ताराबाई मोहूर्ले, गिताबाई गेडाम, लालाजी आरेवार, अमोल जोनमवार, राकेश गुंडावार, अनिल येनगंटीवार, ग्रामसेविका पाकमोडे, मुख्यधापिका आईंचवार मंचावर होते. 
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलाकर लोडेलीवार यांनी केले तर संचालन मांदाडे सर यांनी तर आभार येनगंटीवार गुरुजी यांनी मानले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli