Today : 11:07:2020


स्ञी भ्रुणहत्या हा समाजाला लागलेला कलंक (मौलाना उमर रजा़ यांचे प्रतिपादन)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- आज २१ व्या शतकातही स्ञी भ्रुणहत्या होते ही बाब समाजासाठी अत्यंत दुख:द व लाजिरवाणी ठरत असुन खऱ्या समाजाच्या प्रगतीसाठी आजची स्ञी विविध क्षेत्रात अग्रेसर दिसत आहे. तिला संवर्धन व जोपासण्याची आवश्यक्ता असुन १४ शे, वर्षापुर्वी ईस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी स्ञी भ्रुणहत्येच्या प्रथेला विरोध करून त्यांना जगण्याचा अधिकार दिला होता. ज्या घरात स्ञी जन्माला येते, त्या घरात ईश्वराची कृपा असते त्यामुळे स्ञीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आज समाज बांधवांनी आत्मसात केली पाहिजे असे मत बरेली येथील मौलाना उमर रजा़ यांनी व्यक्त केले ते कोरपना येथे नवजवान अहेले सुन्नत कमेटीच्या वतीने ईद मिलादुन्नबी दिनाच्या निमित्याने आयोजीत कार्यक्रमा दरम्यान बोलत होते.
     मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर, ईस्लाम धर्माच्या निती व सिद्धांतावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. मौलाना शेर खान रिज़वी यांनी प्रबोधन करून नमाज़, शिक्षणावर अधिक भर दिला. ईस्लाम धर्म हा कोणत्याही परिस्थितीत आंतकवादाचे समर्थन करित नाही. शांती, सदभाव प्रार्थना व नितीचा संदेश देणाऱ्या पैगंबरांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याची गरज असुन ईस्लाम धर्म नशेला मान्यता देत नाही, नशा व  लालसेच्या आहारी जाऊन गैर कृत्या पासुन तसेच समाजात कोणाचाही अपमान होईल अशा वागणुकी पासुन दुर राहा. "मज़हब नही सिखाता, आपस मे बैर रखना, हिंदी है हम वतन है, हिंदुस्तां हमारा, असे म्हणत विधवांना, गोरगरीबांना सदैव मदत करत राहा, असे मोलाचे मार्गदर्शन मौलाना रजा़ यांनी उपस्थितांना केले. 
     मौलाना सादीक रजा़, मो.फवाद रजा़ बरेलवी, मो.हसनैन रजा़ गडचांदुर, मो.सत्तार, मो.मंजुर आलम, मो.खुर्शीद आलम, सुहेल सुन्नी इत्यादींनी मागदर्शन करुन समाजाने शांती मार्गाने चालण्याचे आवाहन केले. नात व प्रबोधनात्मक विचारांची मेजवानी यावेळी अनुभवता आली.
     जामा मशिद कमेटीचे असरार अली, मोहम्मद नवाज़, शेख इस्माईल, शेख शकील, जुबेर शरीफ़, सोहेल अली, मसुद अली, आसीफ़ शाह, सैय्यद अबरार अली, सलीम पारेख़, हाफीज़ आदील खान, शहेबाज बेग, ज़ूबेर शेख, लतीफ, इरफान शेख, निसार, फहीम, जमीर, मजीद, तौसीफ, अफरोज़ शेख, नावेद, रशीद बेग, गुलाब शेख यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी परिश्रम घेतले. यावेळी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवुन कार्यक्रमाचा लाभ घेतला.
News - Chandrapur | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli