Today : 21:09:2019


कढोली (खु.) वासीयांच्या इशाऱ्या नंतर ही शिक्षण विभाग कुंभकरणी झोपेत (शिकणाची लागली वाट / शिक्षण मंञी लक्ष देणार का ?)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :-  कोरपना पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कढोली या गावात दोन नवीन शाळा इमारतीचे बांधकाम मागील तीन वर्षा पासुन अर्धवट पडुन असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अक्षरशा: वाट लागली आहे. या ठिकाणी जुनी एक इमारत अस्तित्वात आहे माञ वर्ग सात खोल्या चार, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एका खोलीत दोन वर्गाच्या मुलांना बसविलेजात आहे. तर इतरांना झाडा खाली बसवुन शिक्षण दिले जात असल्याचे विदारक चिञ आहे. 
     तसेच याची जाणीव संबंधीतांना करुन देण्यात आली, माञ पाझर फुटत नसल्याने शेवटी गावकऱ्यांनी १४ डिसेंबर पर्यंत अपुऱ्या इमारतीच्या कामाला सुरुवात करा अन्यथा १५ डिसेंबर पासुन विद्यार्थ्यांची शाळा कोरपना पं.स.पुढे भरवु असा इशारा निवेदना द्वारे जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्यासह संबंधीत विभागाला देण्यात आला आहे.  माञ अजून याविषयी काहीच हालचाली दिसत नसल्यामुळे आश्चर्यसह संतापही व्यक्त होताना दिसत आहे. या प्रकारामुळे शासन, प्रशासन शिक्षणा विषयी किती गंभीर आहे याची प्रचिती येते.
     शासन शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नवनविन प्रयोग करुन पाहत आहे. माञ संबंधितांकडून याला  हरताळ फासले जात असल्याचे पहायला मिळत आहे. कढोली (खुर्द) येथील जिल्हा परिषद शाळाचे सर्व शिक्षा अभियान २०११ आणि जिल्हा परिषद (ई.टेंडरींग) अंतर्गत २०१३-१४ असे दोन इमारतीचे बांधकाम गेल्या तीन वर्षा पासून अर्धवट परिस्थितीत पडून आहे. यामूळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन शिक्षणाचा मोठा नूकसान होताना दिसत आहे. 
     याविषयी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे ठराव संबंधितांना देण्यात आले. दोन्ही सभापतींची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीचे दर्शन घडविण्यात आले. माञ प्रत्येकवेळी आश्वासना शिवाय काहीच पदरी पडले नाही. सात वर्ग असलेल्या या शाळेत चार खोल्या असून जागा अपुरी पडत असल्याने वर्ग सात, खोल्या चार, अशी परिस्थिती सध्या याठिकानी निर्माण झाली आहे. अर्धवट पडलेल्या दोन्ही नवीन इमारतीचे उर्वरीत काम येत्या १४ डिसेंबर पर्यंत सुरु करा अन्यथा १५ पासून शाळेच्या सर्व मूलांना सोबत घेऊन कोरपना पंचायत समिती पूढे शाळा भरविण्याचा इशारा गेल्या आठ दिवसापुर्वी संबंधित विभागाला देण्यात आला माञ शासन, प्रशासनावर याचा काहीच परिणाम होताना दिसत नसल्याचे अनुभवास येत असुन शिक्षण विभाग शिक्षणा विषयी किती गंभीर आहे याचे जिवंत उदारण कढोली (खु.) गावात पहायला मिळत आहे. आता शिक्षण मंञ्यांनीच याकडे जातीने लक्ष देऊन समस्या मार्गी लावाण्याची तसेच या संबंधी चोकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी कढोलीकरांनी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक्षल चकमकीत १ जवान गंभीर (व

2018-01-08 | News | Gadchiroli