Today : 17:02:2020


नरभक्षक वाघाने घेतला महीलेचा बळी (वनविभागाची मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ २५ हजाराची मदत नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही वनपरिक्षेेत्रांतर्गत येत असलेल्या वनात पट्टेदार वाघासह अन्य हिस्त्र पशुचा वावर आहे. जंगल परिसराला लागून शेत-शिवार असलेल्या शेतकऱ्याना वन्यप्राण्याचा त्रास नियमित सहन करावा लागतो आहे. सिंदेवाही येथील महीला शेत-शिवारात कामासाठी गेली असता नरभक्षी वाघाने अक्षरशः त्या महीलेला खाल्ले, तसेच या परिसरातील पहीलाच बळी असल्याचे दिसून येते. मृतक कमल निकोडे यांच्या कुटुंबियाना तात्काळ आर्थिक मदत म्हणून २५ हजार रुपये वन विभागाकडून देण्यात आली.
     या नरभक्षी वाघाला मनुष्य प्राण्याच्या रक्ताची चव लागल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणखी मनुष्यप्राण्याचे बळी जावू नये याकरिता त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.
     सिंदेवाही येथील महीला कमल केशव निकोडे वय ५० हि शनिवार दुपार १२ वाजताच्या सुमारास जंगल परिसरातील शेत-शिवारात कामाकरिता गेली होती. मात्र सायंकाळला अंधार होवून ही घरी न आल्याने शोधा-शोध सुरु केली. तिचा थांगपत्ता न लागल्याने वनविभाग व पोलीस विभाग यांना माहिती देण्यात आली. वनविभागाने जंगल परिसरात सर्च मोहिम सुरु केली मात्र रात्रौची वेळ असल्याने कोणताही सुगावा हाती न आल्याने पुन्ह: सकाळला शोध मोहिम सुरु केली. कम्पारमेंट नं २४९ सयागोंदी परिसरातील जंगलात त्या महिलेचे लचके तोडलेले शरिराचे तुकडे छिन्न-विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. हि माहिती मिळताच नागरिकांनी घटना स्थळी गर्दी केली. 
     सदर घटनेचा पंचनामा वनविभागाने केला असून शव विच्छेदना करिता मृतदेह नेण्यात आला. वनविभागाचे अधिकारी यांनी मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ नगद स्वरुपात २५ हजार रुपयाची आर्थिक मदत दिली असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी, गोंड तसेच क्षेत्र सहाय्यक, करंडे यांनी दिली. परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली असल्याने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09