Today : 27:02:2020


शेतकऱ्यांच्या विविध मागण्याघेऊन भिसीत १५ डिसेंबरला भव्य बैलबंडी मोर्चा व रस्ता रोको आंदोलन - डॉ.सतीश वारजूकर करणार नेतृत्व

पंकज मिश्रा, भिसी (चिमुर) :- चिमुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता जिल्हा परिषद चंद्रपुरचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान गटनेता सदस्य डॉ. सतीश वारजूकरांच्या नेतृत्वात दिनांक १५ डिसेंबर रोज शुक्रवार ला सकाळी ११ वाजता भिसी येथील चौरस्ता येथे बैलबंडी मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले आहे. 
     या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी मांङल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने भिसी वाढोणा येथे वनविभागाने मंजूर केलेल्या जाळीच्या कुंपणाचे निविदा पुनश्च काठण्यात याव्या, जंगली जनावरांपासुन होणारी शेतीची नुकसान भरपाई नुकसानीच्या तुलनेत देण्यात यावी, स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव व अधीकचा ५० टक्के नफा देण्यात यावा, शेतकऱ्यांसाठी २४ तास थ्री फेज विद्युत पुरवठा देण्यात यावा, कृषी पंपाची डिमांड भरताच एक महिण्याच्या आत विजजोडणी झालीच पाहिजे, गोसेखुर्द प्रकल्पाच्या मोखाबर्डी उपसा जलसिंचन कालव्याचे दुरूस्तीसह बांधकाम पुर्ण करून २०१७ ला शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणि देण्याचे आश्वासन लोकप्रतीनिधींनी पूर्ण करावे, शेतमजुरांना शेतीसाठी शासकिय जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे, वनडेपोत बांबु व लाकडांचा पुरवठा नियमित उपलब्ध करून देण्यात यावा, भिसी परिसरातील चिचोली सावर्ला, डोंगर्ला, जांभुळविहिरा, नवेगांव, पुयारदंड, गडपिपरी, सिरसपुर, शिवरा, लावारी, इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या शेती जंगल लगत असल्यामुळे त्यांच्या शेतातील पिकांची जंगली जनावरे नासधुस करित असतात त्यामुळे सदर गावांच्या जंगल सभोवताल काटेरी कुंपन करण्यात यावे, विद्युत कंपण्यांमार्फत शेतात उभारल्या जाणाऱ्या विद्युत टावर चा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा.
     उपरोक्त मागण्या मान्य करवून घेण्याकरीता आयोजीत मोर्चामध्ये तालूक्यातील सर्व जनतेनी हजारोंच्या संख्येने ग्राम सचिवालय बाजार चौक भिसी येथे उपस्थित राहावे असे आव्हान भिसी कॉग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli