Today : 04:07:2020


राज्यातील वनरक्षक, वनपालांचा सामुहिक संप - जंगल, वन्यजीव व सुरक्षा वाऱ्यावर (राज्यातील ९ हजार वनरक्षक व २७०० वनपालांनी पुकारला संप)

प्रविण गायकवाड, सावली :- राज्यातील ९ हजार वनरक्षक आणि २७०० वनपालांनी राज्य शासनाच्या अन्यायकारक वेतन श्रेणीच्या धोरणाविरोधात सोमवार ११ डिसेंबर रोजी एक दिवसीय सामूहिक संप पुकारला आहे. तसेच जिल्हास्तरावर धरणे आंदोलन करून शासन धोरणाचा निषेध नोंदवतील, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 
     वनरक्षकपद तलाठी, पोलीस शिपाई तर वनपालपद पोलीस उपनिरीक्षक, नायब तहसीलदार या समकक्ष पदा प्रमाणे आहे. मात्र, पाचवा वेतन आयोग लागू करताना वनरक्षक, वनपालपदांना मागे ठेवल्याच्याविरोधात गतवर्षी ११ दिवसांचा संप पुकारण्यात आला होता. त्यावेळी वन कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अपर प्रधान वन संरक्षक डॉ. मुंडे यांनी पुढाकारा घेत वेतन श्रेणीचा प्रश्न सोडविला जाईल, असे ठोस आश्वासन दिले होते. 
     मात्र वर्षभराचा कालावधी झाला असताना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आली नाही. परिणामी शासन धोरणाचा निषेध म्हणून वनविभाग, वन्यजीव आणि सामाजिक वनिकरण विभागाचे वनरक्षक, वनपाल एक दिवसीय संपावर जाणार आहे. वनरक्षक व वनपालांची पदे ब्रिटीशकालीन काळापासून जैथे थे आहेत. मात्र पदवाढसंदर्भात वरिष्ठ अधिकारी केवळ समिती गठित केल्याचा फार्स करीत असल्याची वनरक्षक, वनपाल संघटनांची ओरड आहे.
     तसेच कर्मचारी २४ तास कर्तव्यावर तैनात राहत असुन वनविभागात जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षणासाठी वनरक्षक, वनपालांना २४ तास कर्तव्यावर तैनात राहावे लागते. परंतु वनरक्षकांचे पद हे वर्ग ३ चे असताना त्यांना वेतन श्रेणी वर्ग ४ ची दिली जाते. जिवाची हमी आणि विम्याचे सुरक्षा कवच नसताना वनरक्षक कोट्यवधींच्या जंगल संपत्तीचे संरक्षण करतात, हे येथे उल्लेखनीय बाब आहे.
     तसेच वरिष्ठांची उदासीनता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अडगळीत पडलेल्या वनविभागाला मध्यप्रदेशाच्या धर्तीवर फ्रंटलाईनवर आणले. परंतु वरिष्ठ वनाधिकाऱ्याच्या उदासीनतेने वनरक्षक, वनपालांना वाढीव वेतन श्रेणीचा न्याय मिळू शकला नाही. किंबहुना राज्यस्तरीय अधिकारी स्वत:चे मेट्रिक ट्रेड व पद वाढविण्यासाठी फिल्डिंग लावतात, हा आजतागायतचा अनुभव आहे.
     तसेच वेतन श्रेणीच्या धोरणाविरोधात सोमवार ११ डिसेंबर रोजी एक दिवसीय सामूहिक संप पुकारला असल्याने सरकार वर कोणत्या दबाव निर्माण होणार व त्याचे परिणाम काय होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच राज्यातील ९ हजार वनरक्षक आणि २७०० वनपालांनी शासनावर कितपत प्रभाव टाकेल आणि कोणते आश्वासन मिळणार किंवा कसे यावर सर्वांची नजर राहणार आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-10


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliविद्यार्थी जेवढा संघर्ष करेल, तेवढा पुढें जाईल : न्यायमूर्ती गिरटकर

2018-01-08 | News | Chandrapur