Today : 11:07:2020


वाघांच्या अस्तीत्वासाठी मनुष्याचा जीव धोक्यात.. (ताडोबा, चंद्रपूर मध्ये असलेले वाघांवर नियंत्रण तरी कुणाचे ? गावकऱ्यांचा जीव आजही वाघाच्याच मुठीत)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- चंद्रपूर (ताडोबा) हा जिल्हा वाघासाठी संपुर्ण देश-विदेशात प्रसिद्ध आहे. ताडोब्यामध्ये दिवसन दिवस पट्टेदार वाघ, बिबट यांची संख्या मोठया संख्येत वाढतच आहे. वन्यप्राण्यासाठी ताडोबा अभयारण्य म्हणून ओळखले जात असले तरी पट्टेदार वाघांनी चंद्रपूर जिल्हयाला देश पातळी सोबत जागतीक स्तरावर प्रसिध्दी झोतात आणले .त्या वाघांचे अस्तीत्व टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन स्तरावरून केले जात आहे. मात्र मनुष्यप्राण्यावर जिल्हयात वाघांचे हल्ले सतत होत असलेल्या घटना बघता वनपरिक्षेत्रालगत असलेल्या गावकऱ्यांचा जीव वाघाच्या मुठीत असल्याचे चित्र डोळयासमोर दिसून येत आहे.
     चंद्रपूर जिल्हयात वाघांचे अस्तीत्व शेकड्याहून अधिक झाले आहे. ताडोबा वनपरिक्षेत्र वाघांच्या अस्तीत्वाचे माहेरघर समजले जाते. त्या वाघांचे दर्शन घेण्यासाठी देशासह विदेशी पर्यटक आतूर असतात. त्यांच्या दर्शनाशिवाय ताडोब्याची सफर पुर्णत्वात येत नाही तेच ताडोबा परिसरातील वाघ भ्रमतीत जिल्हयातील लगतच्या वनपरिक्षेत्रात विखुरले आहेत. तसेच त्यांचे दर्शन वनपरिक्षेत्रालगत असलेल्या गावांना घडत असतात. मात्र तोच वाघ मनुष्यप्राण्याच्या जिवावर उठत असल्याने गावकऱ्यामध्ये वाघांची दहशत परिसरातील जनतेला नेहमीच सतावत असते. गावपरिसर असो अथवा शेत-शिवार असो वाघाच्या अस्तीत्वामुळे मानवाच्या जीवाची जोखीम निर्माण झाली आहे.
     शेती हंगामावेळी वाघ, बिबट व अन्य वन्यप्राण्यामुळे शेती करणे शेतकऱ्यांना अवघड होत चालले आहे. वन्यप्राण्याने मानवावर हल्ले केलेल्या घटना जिल्हयातील बहुतेक तालुक्यात घडलेल्या आहेत. सावली तालुक्यात नुकत्याच घडलेल्या घटनेत चक्क वाघाने (बिबट) घरात जेवन करित असलेल्या मुलाला पडविल्याची घटना घडली. वाघांच्या हल्ल्याच्या घटना जिल्हावासियांना नवीन राहीलेल्या नाही. कित्येक वर्षापासून वाघांच्या हल्ल्याच्या घटनेत मानवाचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. शासन स्तरावरून वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून आठ लाख रूपये दिले जाते. वाघासाठी मानवाच्या जिवाची किंमत पैशाने ठरलेली आहे.
     जंगलातील हिस्त्र पशु वाघावर नियंत्रण ठेवणारी एक विशेष यंत्रणा असणे हे अगत्याचे झाले आहे. "मानव आणि वाघ यांचा संघर्ष अस्तित्वाच्या लढाईत होत तर नाही ना असा प्रश्न उपास्थित होत आहे."
     सिंदेवाही तालुक्यात घडलेल्या वाघाच्या हल्ल्यात नरभक्षक वाघाने सहशा त्या महिलेच्या शरीराचे इतके लचके तोडले की ते दृश्य पहाणाऱ्याला थरकाप उडविणारी घटना घडली आहे. म्हणजे त्या ठिकाणी वाघ एक नसून त्या परिसरात संख्येने वाघ असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आजच्या घडीला सिंदेवाही परिसरात वाघाचे दर्शन घडत असल्याचे सांगण्यात येत असल्याने वाघाची दहशत सर्वत्र पसरली आहे. नरभक्षक वाघाचा शोध घेवून वाघांचा चोख बंदोबस्त करणे ही जवाबदारी आता वनविभागावर येवून ठेपली आहे.
     वाघाचे सतत हल्ले होत असून वनविभागाने फक्त दोन चमू नेमून सबंधित घटना परिसरात वाघाच्या शोधाकरीता कॅमेरा लावण्यात आले आहे. वाघाचा शोध व पुढे विपरित घटना घडू नये म्हणून वाघाचा बंदोबस्त करण्यास वनविभाग चे दोन चमू कितपत यशस्वी ठरते ते समोर दिसून येणाऱ्या वेळात कळणार आहे. जिल्हयातील वाघाच्या मानवावर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनावरून मानवाला वन्यप्राण्याच्या संघर्षाला तोंड देण्याची पाळी आली आहे. वनपरिसरातील गावातील जनतेवर वन्यप्राण्याच्या हल्ल्यामुळे मानवाचा जीव वाघाच्या मुठीत असल्याची म्हणण्याची पाळी जनतेवर आली आहे नरभक्षक वाघ पुन्ह: हल्ला करणार नाही व कोणची जिवीत हानी होणार नाही याची कितपर दाखल वनविभागा मार्फत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

संत मानवदयाल विद्य