Today : 13:11:2019


चंद्रपूर जिल्हा दारू बंदी करून काय सिद्ध केले.. याचा अॅड. गोस्वामी यांनी आधी अभ्यास करावा :- राजू गैनवार

अतुल कोल्हे, भद्रावती  :-  दारूमुक्त महाराष्ट्र करण्याचे नेतृत्व राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्विकारले असे आव्हान श्रमिक एलगार अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांनी केले. "गोस्वामी यांनी चंद्रपूर जिल्हा दारूबंदी करून काय साध्य केले.. याचा आधी अभ्यास करावा आणि नंतरचा महाराष्ट्र दारूमुक्त करण्याचा विचार करावा.." अशा शब्दात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव काँग्रेड राजू गैनवार यांनी एका पत्रकारद्वारे कळविले.
     १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. या माध्यमातून परवान्याची ५५० दुकाने बंद झाली. श्रमिक संघटनेच्या माध्यमातून सुरू झालेले दारूबंदीचे आंदोलन सुधीर मुनघंटीवार यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाले. दारूबंदी नंतर या जिल्ह्यात अवैध दारूचा जोपार वाहने सुरू झाले. त्यास थांबविण्याचा प्रयत्न मात्र पाहिजे त्या प्रमानात झालेला दिसत नाही. भ्रमनध्वनीवर दारूची मागणी केल्यास ५ मिनटात दारूची बॉटल हाती येते. आज या अवैध दारू व्यवसायात शाळकरी, महाविद्यालयीन व होतकरू विद्यार्थी जे चांगले शिक्षण घेवुन आपले आयुष्य घडविणार होते ते या व्यवसायात गुंतून गुन्हेगारी वाढले आहे.
     या जिल्ह्यात दारू सुरू असतांना ब्रावून शुगर, चरस सारख्या अमली पदार्थने शिरकाव केला नव्हता तो दारुबंदी नंतर झाला. हेच ते काम दारूबंदी चे फलीत ज्यांच्याकडे दारूचे परवाने होते त्यांच्यापैकी कुणीही या अवैध दारू व्यवसायत उतरले नाहीत. गुन्हेगारी प्रवृत्तीत लोक अवैध दारूच्या माध्यमातून आलेल्या पैशाच्या उपयोग राजकारणात येण्यासाठी करीत आहे आणि हेच नंतर राजकारनात यशस्वी होऊन देशाची धुरा सांभाळणार म्हणजे देशाची भविष्यात आशा लोकांच्या हातात देण्याचा स्वप्न: पारोमिता गोस्वामी यांचे तर नाहीना अशी शंका गैनवार यांनी व्यक्त केली आहे.
     गुजरात राज्यात संपूर्ण दारूबंदी असताना सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू मिळत असल्याचे चित्रपट शाहरुख खान यांनी अभिनय केलेल्या रईस या हिंदी चित्रपटात आपण पाहिलेच आहेत. एखादा साधा-सुधा व्यक्ती सुद्धा या व्यवसायाच्या माध्यमातून गुन्हेगार कसा होतो हे या चित्रपटात दाखविले आहे. असाच महाराष्ट्र घडविण्याचा प्रयत्न पारोमिता गोस्वामी यांचा तर नाहीना, आपल्या राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या दारूबंदी जिल्ह्याची अवस्था पाहता खरच यातून सदृढ महाराष्ट्र घडले का ? याचा विचार गोस्वामी यांनी आधी करावा संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी करण्यापेक्षा अॅड गोस्वामी यांनी या तिन्ही जिल्ह्यात अवैध्य दारू मिळणार नाही यासाठी आधी लढा उभारावा, दारूबंदी सारख्या आंदोलना मार्फत प्रसिद्धी मिळण्याच्या त्यांनी चालविलेला हण्यास सोडावा. कारण असे आंदोलन करायला मोठे कष्ट लागत नाही. परंतु त्यानंतर या जिल्ह्यात अवैध दारूचे पाट वाहत आहे ते थांबविण्याचा कोणताच प्रयत्न केलेला नाही. त्यांना माहित आहे कि, अवैध दारूबंदीचे काम दारूबंदी एवढे सोपे नाही त्यामुळे अॅड गोस्वामींनी संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी करण्यासाठी खासदार सुळे यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये गैरवार यांनी शेवटी निवेदनात म्हटले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

दोन वर्षात या ठिकानचा चेहरा - मोहरा बदललेला दिसेल : आ.अॅड.धोटेंची ग्वाही (अमलन

2018-01-08 | News | Chandrapur