Today : 10:07:2020


विदर्भाच्या मागणीसाठी गडचांदुर, नंदाफाटा 100 टक्के बंद (कार्यकर्त्यांना अटक/पोलिसांचा चोख बंदोबस्त)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :-  वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सोमवारी विदर्भवाद्यांनी बंदची हाक दिली होती. यात गडचांदुर व नांदाफाटा येथील बाजारपेठ 100 टक्के बंद होती. व्यापाऱ्यांनी स्वखुशीने आपली प्रतिष्ठाने बंद करून वेगळ्या विदर्भाच्या मागणीला समर्थन दर्शविले शाळा, महाविद्यालय पुर्ण बंद होते. विदर्भवाद्यांनी काढलेल्या भव्य रॅलीत विद्यार्थी, नागरिकांनी मोठ्या संख्यने सहभाग घेऊन काही चालु असलेली दुकाने विनंती करून बंद करण्यात आली. वेगळा विदर्भ झाला पाहीजे, अशा गगनभेदी नाराऱ्यांनी शहर अक्षरशा: हादरले होते. 
     तसेच प्रविण गुंडावार, निळकंठ कोरांगे, दिलीप आस्वले, संतोष पटकोटवा, अनील चटप, गौरकार गुरूजी, सैय्यद मुम्ताज़ अली, शेख सलीम, मनोहर सातपुते यांच्यासह शेकडो शेतकरी संघटना व विदर्भवादी कार्यकर्ते तसेच गडचांदुर तालुका संघर्ष समितीचे उद्धव पुरी, अशोक उमरे इतरांची उपस्थिती होती. व्यापारी संघटना व नागरिकांच्या सहयोगाने शहरात कडकडीत बंद पाडण्यात आल्याचे पहायला मिळाले.
     नांदाफाटा येथे विदर्भवादी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करुन रस्ता रोको केले. पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना अटक करुन रस्ता खुला केला. प्रभाकर दिवे, रत्नाकर चटप, मनोहर झाडे, विनोद टोंगे, आशिष मुसळे, शंकर भोंगळे, शिवाजी बोडे, लटारी ताजने, किसन कडूकर, मंगेश माहुरे या कार्यकर्तांना पोलिसांनी अटक करून कारवाई केली. या सर्वांची राजुरा न्यायलयातुन सूटका करण्यात आली. बंद दरम्यान कोणता ही अनुचित प्रकार घडु नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विनोद रोकडे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
News - Chandrapur | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण<