Today : 04:04:2020


स्वस्थ व निरोगी शरीर निर्मितीकडे युवकांनी आकर्षित व्हावे (सौष्ठव स्पर्धा आमदार चषक २०१७ नागभीड) : आ. किर्तीकुमार भांगडिया

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :-  स्वस्थ व निरोगी शरीर निर्मितीकडे युवकांनी आकर्षित व्हावे यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रोत्साहनाने  आमदार चषक -२०१७ या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन चिमूर विधानसभा क्षेत्र आमदार किर्तिकुमार भांगडीया आणि ए.बी.बी.ए. नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच १० डिसेंम्बर रविवारला ५ वाजता ट्विंकल इंग्लिश स्कुल नागभीड येथे करण्यात आले होते.
     स्पर्धेचे उदघाटन आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या हस्ते संपन्न झाले. तत्पूर्वी याच मंचावरून आमदार मितेशजी भांगडीया यांच्या वाढदिवसा निमित्य नागभीड तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळ व भजन मंडळांना साउंड सर्व्हिस, तबला पेटी व अपंगाना सायकलचे वितरण आमदार बंटीभाऊ भांगडीया आणि भाजपा प्रमुख पदाधिकारी व इतर पाहुण्यांच्या  हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना माननीय आमदार बंटीभाऊ म्हणाले कि, नागभीड येथील विविध विकासकामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. नागभीड येथे लवकरच आधुनिक सोई सुविधांनी परिपूर्ण असे बसस्थानक निर्माण करण्यात येईल. याप्रसंगी त्यांनी  स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे आभार मानले. 
     शरीर सौष्ठव स्पर्धेला संपूर्ण  महाराष्ट्रातील १२३ बॉडी बिल्डर्स सहभागी झाले होते. ए.बी.बी.ए. अध्यक्ष राजेश तोमर, सचिव संयोजन समिती आय.बी.बी.एफ. अरुण देशपांडे, अशोक खुडे, राहुल रामाणी, दिपक यादव, राजेश गिरीपुंजे, आशिष मोहाडीकर, आशिष बाथो, मनोज हिरुळकर, तुरेंद्र देशमुख, संजय हेमराजानी स्पर्धा निरीक्षक म्हणून उपस्थित होते. विविध वजन गटात झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना ६.५ लक्ष रू.चे भरघोस बक्षिसे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. ६० किलो वजन गटात १४ स्पर्धक सहभागी झाले होते. या वजन गटात प्रथम बक्षीस जमाल अन्सारी, द्वितीय मनोज महल्ले, तृतीय दिनेश नंदेश्वर, चौथे मयुर मेहके आणि पाचवे बक्षीस दत्तू सावरकर यांनी पटकाविले.
     तसेच ६५ किलो वजन गटात ३६ स्पर्धक सहभागी झाले होते. या वजन गटात प्रथम बक्षीस मुकेश तूये, द्वितीय अभिषेक गायकवाड, तृतीय मनीष बाथो, चौथे सुशील पटले आणि पाचवे बक्षीस एजाज खान यांनी पटकाविले. ७० किलो वजन गटात स्पर्धक सहभागी झाले होते. या वजन गटात प्रथम बक्षीस आफाक खान, द्वितीय घनश्याम माने, तृतीय योगेश शेंडे, चौथे  राज अटकापुरे आणि पाचवे बक्षीस अर्पित कुटे यांनी पटकाविले. ७५  किलो वजन गटात १५ स्पर्धक सहभागी झाले होते. या वजन गटात प्रथम बक्षीस कमलेश कश्यप, द्वितीय तिर्थानंद यारिया, तृतीय ईशांत पंडित, चौथे  चेतन काशीकर आणि पाचवे बक्षीस शादाब खान यांनी पटकाविले. ८० किलो वजन गटात ६ स्पर्धक सहभागी झाले होते. या वजन गटात प्रथम बक्षीस सुरेंद्र शाहू, द्वितीय मोहमद आवेश, तृतीय चित्तरंजन कुमार, चौथे झाकीर खान आणि पाचवे बक्षीस रामेश्वर राजूरकर यांनी पटकाविले. शेवटच्या ८५ किलो वजन गटात स्पर्धक सहभागी झाले होते. या वजन गटात प्रथम सर्वेश शाहू, द्वितीय विजय भोयर, तृतीय राज शाहू, चौथे वैभव मारकेटवार  आणि पाचवे कमलेश झोड यांनी पटकाविले.
     कार्यक्रमाला जि.प.उपाध्यक्ष क्रिष्णाजी सहारे, भाजपा जेष्ठ नेते वसंत वारजूरकर, नगराध्यक्ष उमाजी हिरे, जि.प.सदस्य संजय गजपुरे, कृ.उ.बा.स.सभापती आवेश पठाण, तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, न.प. उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, न.प.बांधकाम सभापती सचिन आकुलवार, मा. दिगांबर पाटील गुरपुडे, पं.स. सदस्य संतोष रडके, पं.स.सदस्या सुष्मा खामदेवे, भाजपा जेष्ठ नेते मोरेश्वर पाटील ठिकरे, कृ.उ.बा.स.उपसभापती रमेश पाटील बोरकर, मा.वामन तलमले, माजी सभापती ईश्वर मेश्राम, प्राचार्य अमीर धम्मानी, व्यापारी अध्यक्ष हनिफभाई ज्यादा, जेष्ठ साहित्यीक राजनजी जयस्वाल, प्राचार्य अनिल कोरपेनवार, नागभीड पी.आय.शेवाळे, नगरसेवकनरेंद्र हेमने, नगरसेवक दशरथ उके, नगरसेवक रुपेश गायकवाड, विजय काब्रा, आरिफभाई मिर्झा, प्रदीप तर्वेकर, राजू चिलबुले, गणपत देशमुख, रविभाऊ चौधरी, सचिन चिलबुले, प्रवीण बंडावार, विलास श्रीरामे, बालू मेश्राम, केदार मेश्राम, अशोक वारजूरकर, पुंडलिक निनावे, प्रितम चहांदे, मुजाहिद शेख, पंकज गरफडे, जोंटी येरने, संजय वादवाणी, राजू पिसे, पुरुषोत्तम मसराम, अनंता बावणे, पवन नागरे, आशीष नुगुरवार, आरिफ शेख, गणेश माथनकर, राहुल पेद्दूरवार, संजय मालोदे, प्रमोद चौधरी, जावेद शेख, जावेद कुरेशी, ओमप्रकाश मेश्राम आदी भाजपा कार्यकर्ते व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


बल्लारशाह-भूसावळ ट्रेन गडचांदुर पासून सूरू करा (शिष्ट मंडळा द्वारे रेल्वे

2018-01-08 | News | Chandrapur