Today : 06:07:2020


खडसंगीत रंगला कबड्डीचा थरार (शालीक बाबा क्रिडा मंडळ मंगरूळ व जागृती क्रिडा मंडळ बेला संघ विजेता)

"हनुमान क्रिडा मंडळ खडसंगी उपविजेता ४० संघाचा सहभाग"
चिमुर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- प्रो-कबड्डीमुळे सध्या देशाच्या मैदानी कबड्डी खेळाला गेलेली लोकप्रियता परत आली आहे. याचाच प्रत्यय ग्रामीण भागात कबड्डी सामन्यांचे आयोजन मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. खडसंगी येथे हनुमान क्रिडा मंडळाब्दारे आयोजीत तिन दिवसीय कबड्डी सामन्यामुळे येथील क्रिडारसिकांनी  कबड्डीचा थरार अनुभवता.
     अनेक वर्षाची परंपरा असलेल्या हनुमान क्रिडां मंडळ खडसंगीव्दारे तिन दिवशीय कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले. तिन दिवसीय कबड्डी सामन्याचे उद्घाटन जि.प.चे माजी अध्यक्ष तथा गटनेता डॉ.सतिश वारजुकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सरपंच यशोदा तराळे, प.स. सदस्य पुंडलीक मत्ते, तंमुस अध्यक्ष नाना मेश्राम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
     तिन दिवसीय कबड्डी सामन्यात एकुण चाळीस संघानी भाग घेतला होता यामध्ये दोन गटात संघाची विभागनी करण्यात आली होती. सामन्याच्या शेवटच्या दिवशी अ गटाचा अंतिम सामना हनुमान क्रिडा मंडळ खडसंगी व जागृती क्रिडा मंडळ बेला. याच्यात झाला यामध्ये बेला संघ विजयी झाला व हनुमान क्रिडा मंडळाचा संघं उपविजेता ठरला. पंचावन किलो गटात शालीक बाबा क्रिडा मंडळ मंगरूळचा संघ विजेता ठरला तर हनुमान क्रिडा मंडळाचा संघ उपविजेता ठरला.
     विजेत्या संघाला पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नाना मेश्राम, तर बक्षिस वितरक म्हनुन प.स. सदस्य अजहर शेख, बंडु बारेकर, दत्तु देव्हारे, किशोर बोरसरे, तानाजी नागोसे, धर्मेंद्र रामटेके, चंद्रसुभाष गुरले, गुणवंत नागोसे, वासुदेव सातपैसे, दिलीप सातपैसे, विलास तराळे आदी मान्यवरांचे हस्ते विजेत्या संघाना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
कार्यक्रमाचे संचालन राजकुमार चुनारकर यांनी तर आभार तानाजी नागोसे यांनी मानले. तसेच कबड्डी सामन्यांच्या यशस्वीततेसाठी मंडळाचे अध्यक्ष लखन बोरसरे, सचिव शादाब कुरेशी, सदश्य हेमंत समर्थ, सुरेंद्र मत्ते, मोहन समर्थ, दिपक पातर व पदाधीकाऱ्याने सहकार्य केले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा ग