Today : 04:07:2020


श्री गुरूदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने (पाच हजार नेत्रहिनांना मिळाली नवदृष्टी, रमाकांत लोधे यांचा स्तृत्य उपक्रम)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :-  दृष्टी शिवाय आपल्या जिवनात प्रकाश नाही. दृष्टी आपल्या जिवनातून गमावली गेली तर आपले जिवन अंधकारमय होणार असे म्हटले जाते. सामाजिक वसा घेतलेले सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी नेत्ररोग तपासणी शिबीर घेवून मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर मोफत राबविला जातो. नुकत्याच झालेल्या शिबिरात ४२५ नेत्रहिन रूग्णावर शस्रक्रिया करण्यात आली. जि.प.सदस्य तथा मंडळाचे अध्यक्ष रमाकांत लोधे यांच्या पुढाकाराने आजपावतो श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाने ५००० नेत्रहिनांना नवदृष्टी दिली आहे.
     त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जाते. श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ रत्नापूर यांच्या स्तुत्य उपक्रमाला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय व लायन्स क्लब चंद्रपूर यांचे सहकार्य लाभत असून दृष्टीहिनांना नवदृष्टी देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे शेकडो गोरगरीब लोकांना त्या उपक्रमाचा लाभ घेता येत आहे. असाच उपक्रम राबविण्यासाठी समाजातील सामाजिक भावना ठेवणारे लोकपुढे येवून प्रत्येक गावात सामाजिक दृष्टीकोन ठेवून सामाजिक वसा जोपासला गेला तर दृष्टीहिनांना नवदृष्टी मिळून समाजासमोर त्यांचेही कार्य प्रेरणादायी ठरू शकते. आजच्या घडीला श्री गुरुदेव नवमंडळ दुर्गा उत्सव मंडळाचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे. 
     नुकत्याच घेण्यात आलेल्या नेत्ररोग तपासणी शिबीरात १२०० रूग्णाची नोंदणी करण्यात आली. त्यात ४२५ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करून शस्त्रक्रिया करण्यात आली. पुन्हा त्यांची पुर्नतपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले. आजपर्यंत या मंडळाने ५००० हून अधिक नेत्रहिनांना दृष्टी दिली आहे. शिबीराच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे समस्त सदस्य सामाजिक दृष्टीकोनातून हिरहिरीने भाग घेवून सहकार्य करतात. श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ स्तृत्य उपक्रमामुळे प्रेरणायी ठरत आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur