Today : 12:11:2019


तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम

दिपक सुनतकर, अहेरी :- तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मागील तीन दिवसा पासून राजे धर्मराव कृषी विद्यालय, अहेरी येथे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचा समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल कत्रोजवार, प्रमुख उपस्थिती नगराध्यक्षा प्राजक्ता पेदापल्लीवार, उपाध्यक्षा अणपुर्णा सिडाम, गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य, तालुका समन्वयक प्रकाश दुर्गे, गटसमन्वयक ताराचंद भुरसे, विषय तत्ज्ञ राजू नागरे, डी.के.महंत, एस.आर. शेख इत्यादीची होती.
     या विज्ञान प्रदर्शनात एकूण ४१० विज्ञान प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या.  दैनंदिन जीवनात विज्ञान व शाश्वत विकासासाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम या मुख्य विषयासह सहा उपविषयावर विज्ञान प्रदर्शनात भर देण्यात आला होता. यात प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक अप्शा मूस्ताक शेख धर्मराव कृषी विद्यालय अहेरी, व्दितीय क्रमांक जयंत प्रणव दत्ता सेंट फ्रान्सीस हाॅस्कूल नागेपल्ली,  तृतीय क्रमांक  परीक्षीत मनोहर गलबले जि.प.शाळा गडअहेरी तसेच माध्यमीक  गटातून प्रथम क्रमांक हूसेन तालीब हूसेन सय्यद सेंट फ्राॅन्सीस हाॅस्कूल नागेपल्ली, व्दितीय क्रमांक पूजा दलाल दडमल राजे धर्मराव हाॅस्कूल आलापल्ली, तृतीय क्रमांक वसीष्ठ भास्कर रामगुंडम रिपल्बीक इंग्लिश मिडीयम स्कूल अहेरी आदिवासी गटातून प्राथमिक मध्ये तेजस गजानन कलसार संत मानव दयाल विद्यालय अहेरी व माध्यमिक गटातून तेजस दिगांबर धोत्रे राणी दुर्गावती हाॅस्कूल आलापल्ली यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. 
सर्व प्राविण्य प्राप्त विद्यार्थीना शिल्ड व प्रमाणपत्र देवून मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांकाचे प्रतिकृतीला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात      
     तसेच प्राचार्य अनिल कत्रोजवार, गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य, नगराध्यक्षा प्राजक्ता पेदापल्लीवार, उपाध्यक्षा अणपूर्णा सिडाम, विषेश साधन व्यक्ती राजू नागरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विज्ञान शिक्षीका जयश्री खोंडे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार शिक्षक उमरे यांनी मानले सतत तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनीचे यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाई